पूरग्रस्तांसाठी रांका परिवाराचा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:11 AM2021-07-30T04:11:20+5:302021-07-30T04:11:20+5:30
पुणे : ज्या ज्या वेळी देशावर नैसर्गिक संकटे आली, त्या त्या वेळी पुणेकरांनी दातृत्वाचा हात नेहमी पुढे केला आहे. ...
पुणे : ज्या ज्या वेळी देशावर नैसर्गिक संकटे आली, त्या त्या वेळी पुणेकरांनी दातृत्वाचा हात नेहमी पुढे केला आहे. काही दिवसांपासून कोकण, सांगली, सातारा, कोल्हापूर इ. भागांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले आहेत. अशा बांधवांना तातडीने मदत गेली पाहिजे या भावनेने पुण्यातील प्रसिद्ध रांका ज्वेलर्स यांच्यावतीने ८ टन जीवनावश्यक वस्तू सांगली-सातारा भागातील गरजूंसाठी रवाना केल्या आहेत.
रांका ज्वेलर्स व त्यांच्या परिवाराने सुमारे १९ वस्तू असलेली ६०० कीट एक दिवसात तयार केली. हे कीट बनवण्यासाठी रांका ज्वेलर्समधील सर्व स्टाफ कामाला लागला होता. सुमारे ८ टन माल आणून ही कीट तयार करण्यात आली. या कीटमध्ये पीठ, पोहे, तांदूळ, साखर, डाल, मीठ, तेल, चहा, ब्रश, पेस्ट, साबण, बॅटरी, मेणबत्ती, काडीपेटी अशा अनेक जीवनाश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
या ६०० कीटचा ट्रक घेऊन रांका ज्वेलर्सचे कर्मचारी काल रात्री या पूरग्रस्त भागाकडे रवाना झाले. यावेळी फतेचंद रांका, ओमप्रकाश रांका, डॉ. रमेश रांका, अनिल रांका, तेजपाल रांका, वास्तुपाल रांका, शैलेश रांका, श्रेयस रांका, सुहास बोरा व रांका परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते.
कोट :
संकटाच्या वेळी लोकांच्या मदतीला येणे ही भारतीय संस्कृती आहे. रांका ज्वेलर्सच्या माध्यमातून हे कर्तव्य आम्ही केले आहे. भविष्यातही काही आवश्यकता भासल्यास आम्ही आमच्या बांधवासाठी उभे आहोत.
ओमप्रकाश रांका, रांका ज्वेलर्स, पुणे
फोटो - रांका ग्रुप १