महापालिका उपअभियंत्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 09:12 PM2018-05-10T21:12:06+5:302018-05-10T21:12:06+5:30

हप्ता मागून तो दिला नाही म्हणून अतिक्रमण कारवाई करुन शिवीगाळ केल्याप्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपअभियंत्याविरुद्ध मार्केटयार्ड पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे़.

ransom case crime registered against municipal sub-engineer | महापालिका उपअभियंत्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

महापालिका उपअभियंत्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देहॉटेलवर अतिक्रमण कारवाई करु नये, यासाठी त्यांच्याकडे दर महा १० हजार रुपयांची मागणी

पुणे : हॉटेलचालकाकडे दरमहा १० हजार रुपयांचा हप्ता मागून तो दिला नाही म्हणून अतिक्रमण कारवाई करुन शिवीगाळ केल्याप्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपअभियंता किशोर पडाळे यांच्याविरुद्ध मार्केटयार्ड पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे़. दोन दिवसांपूर्वी महापालिकेत मारहाण झाल्याबद्दल शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पडाळे यांनी फिर्याद दिली होती़. 
याप्रकरणी मनिष हेगडे (वय ४७, रा़ भवानी सोसायटी) यांनी फिर्याद दिली आहे़. ही घटना २७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान बिबवेवाडी -कोंढवा रोडवरील हॉटेल मेघदूत येथे घडली़. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेगडे यांचे गॅलक्सी सोसायटीमध्ये हॉटेल मेघदूत नावाचे हॉटेल आहे़. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे निरीक्षकांनी हेगडे यांच्या हॉटेलवर अतिक्रमण कारवाई करु नये, यासाठी त्यांच्याकडे दर महा १० हजार रुपयांची मागणी केली़ हेगडे यांनी त्याला नकार देताच त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने हॉटेलमधील मुख्य दरवाजाजवळ असलेले सिमेंटचे कट्ट्यावरील डीफ्रिज आणि लाकडी सर्व्हिस काऊंटरची तोडफोड केली़. हॉटेलच्या आतील बाजूस असलेले स्टीलचे पावभाजी काऊंटर,२० स्टीलच्या खुर्च्या व ५ स्टीलचे टेबलाची तोडफोड व नुकसान केले़. हेगडे यांना हॉटेलमधून बाहेर ओढले़ त्यांना याबाबतची कोणतीही पोहोच पावती न देता हॉटेलमधील सामान घेऊन गेले़. तसेच हॉटेलमधील मॅनेजर व स्टाफला शिवीगाळ करुन यापुढे हॉटेलमधील सामान काढून दिले नाही तर महापालिका कायदा ५३ प्रमाणे तुमच्यावर कारवाई करेन, अशी धमकी दिली आहे़. हेगडे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक व्ही़ एस़ देशमुख अधिक तपास करत आहे. याबाबत पोलीस निरीक्षक व्ही़ एस़ देशमुख यांनी सांगितले की, फिर्यादी हेगडे यांनी अगोदर महापालिकेत तक्रार करण्याचा प्रयत्न केला़. त्यांना पोलिसांकडे तक्रार करायला सांगण्यात आल्याने त्यांनी आता फिर्याद दिली आ.हे़ 
याबाबत किशोर पडाळे यांनी सांगितले की, या हॉटेलवरील कारवाई बांधकाम विभागाने केली असून अतिक्रमण विभागाकडून त्यांना कर्मचारी पुरविण्यात येतात़. स्वत: महापालिका आयुक्तांनी या कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत़. आपल्या मारहाण झाल्याची फिर्याद नोंदविण्यात आल्यानंतर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची कल्पना महापालिका आयुक्तांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली होती़.

Web Title: ransom case crime registered against municipal sub-engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.