सांगली, मिरज येथील रेल्वे स्टेशनचे प्रश्न सोडवणार, रावसाहेब दानवेंचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 11:02 AM2024-01-08T11:02:32+5:302024-01-08T11:05:01+5:30
पुणे : राज्य सरकारशी सल्लामसलत करून सांगली, मिरज येथील रेल्वे स्टेशनचे प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन रेल्वे , कोळसा ...
पुणे : राज्य सरकारशी सल्लामसलत करून सांगली, मिरज येथील रेल्वे स्टेशनचे प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले. रविवारी पुणे स्टेशनला भेट दिल्यानंतर आणि सर्किट हाऊस येथे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, रेल्वे विभागाच्या डीआरएम इंदू दुबे यांच्यासाेबत बैठक घेतल्यानंतर ते बाेलत हाेते.
या प्रसंगी डॉ. खाडे यांनी सांगली जिल्ह्याच्या विविध प्रश्नांवर आणि हुबळी विभागातील विजयनगर स्टेशन प्रांगणातील जनतेच्या सोयी-सुविधांबाबत, सोलापूर विभाग आणि दक्षिण पश्चिम विभागातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. या बैठकीला अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह, मुख्य अभियंता (बांधकाम) सुरेश पाखरे, वरिष्ठ विभागीय अभियंता विजय कुमार राय आदी उपस्थित होते.