कोथरुडमध्ये मुकबधीर मुलीवर बलात्कार
By Admin | Updated: June 30, 2017 15:44 IST2017-06-30T15:28:37+5:302017-06-30T15:44:51+5:30
ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 30 - कचरा वेचक मुकबधीर मुलीवर बलात्कार करणा-या आरोपीला कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे. पिडीत मुलीचे ...

कोथरुडमध्ये मुकबधीर मुलीवर बलात्कार
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 30 - कचरा वेचक मुकबधीर मुलीवर बलात्कार करणा-या आरोपीला कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे. पिडीत मुलीचे आईवडील अंध आणि भाऊही मुकबधीर आहे. या घटनेमुळे दारिद्रयाचे दशावतार अनुभवणा-या कुटुंबावर आघात झाला आहे.
सहारुल इस्लाम अब्दुल वाहीद लष्कर ऊर्फ शाहरुख (वय 26, रा. आदर्श चौक, केळेवाडी, कोथरुड) असे अटक आरोपीचे नाव आहे. पिडीत मुलीच्या वडीलांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुळचा आसाममधील सिलचर जिल्ह्यातील पालगट दलाईखाना येथील रहीवासी आहे. त्याचे लग्न झालेले असून गेल्या चार वर्षांपासून तो पुण्यामध्ये राहण्यास होता.
पिडीत मुलगी 16 वर्षांची असून केळेवाडी परिसरात राहणारी आहे. अंध आई वडील आणि मुकबधिर भावासोबत ती राहते. आईवडीलांना काम करणे शक्य नसल्याने ही मुलगी कचरा आणि भंगार वेचून कुटुंबाची गुजराण चालविते. तिचे कोथरुडमधील मुकबधीर विद्यालयात सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे.
आरोपीचे लग्न झालेले असून त्याची पत्नी गरोदर आहे. ही मुलगी कचरा वेचायला जात असताना आरोपीने तिला गाठले. तिच्याशी लगट करीत तिला पैशांचे आमिष दाखवले. तिला कोथरुड भागातील रवी मोरे यांच्या पडक्या बंगल्याच्या गच्चीवर नेऊन तसेच जवळच्या पेरुच्या बागेमध्ये नेऊन वारंवार बलात्कार केला. हा प्रकार मार्च महिन्याच्या घडला होता. ही मुलगी गर्भवती राहिल्यानंतर सर्व प्रकार उजेडात आला. पिडीत मुलीच्या वडीलांनी गुरुवारी संध्याकाळी कोथरुड पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार कथन करताच पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करुन घेतला. याप्रकरणी आरोपीला तात्काळ संध्याकाळीच शाहरुखला शोधून त्याला गजाआड केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ फुगे यांनी दिली.
https://www.dailymotion.com/video/x8456wx