'तथाकथित'समाजसेवक अक्षय बोऱ्हाडेच्या अडचणी वाढल्या; जुन्नरमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 10:30 PM2021-09-06T22:30:18+5:302021-09-06T22:35:21+5:30

जुन्नर पोलीस ठाण्यात बोऱ्हाडे याच्यावरचा हा चौथा गुन्हा असून या अगोदर खंडणी, पत्नीला मारहाण आणि कामगाराला मारहाण करून त्याची मजुरी न देणे या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Rape Crime registred against 'So-called' social worker Akshay Borhade at Junnar police station | 'तथाकथित'समाजसेवक अक्षय बोऱ्हाडेच्या अडचणी वाढल्या; जुन्नरमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल

'तथाकथित'समाजसेवक अक्षय बोऱ्हाडेच्या अडचणी वाढल्या; जुन्नरमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल

googlenewsNext

जुन्नर : मनोरुग्णांची सेवा करण्याचा आव आणणारा तथाकथित समाजसेवक आणि शिवऋण युवा प्रतिष्ठानचा अध्यक्ष अक्षय मोहन बोऱ्हाडे याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा जुन्नर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी ही माहिती दिली. बोऱ्हाडे याच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात हा चौथा गुन्हा असून त्याच्यावर या अगोदर खंडणी, पत्नीला मारहाण आणि कामगाराला मारहाण करून त्याची मजुरी न देणे या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

शिवऋण युवा प्रतिष्ठानचा अध्यक्ष अक्षय मोहन बोऱ्हाडे याच्यासह सोनू आणि रोशन (पूर्ण नाव माहिती नाही) गुन्हा दाखल केला आहे .

शिरोली बुध्रुक येथील अक्षय बोऱ्हाडे याने एका तरुणीला लग्नाचे अमिष दाखवत नोव्हेंबर 2019 ते डिसेंबर 2019 या काळात जुन्नर शहरातील लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. तर सोनू आणि रोशन यांनी शिवीगाळ, दमदाटी केली होती. या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी वरील तिघानावर गुन्हा दाखल केला आहे . बोऱ्हाडे हा १ सप्टेंबरपासून जुन्नर पोलिसांच्या ताब्यात आहे. 

अक्षय बोऱ्हाडेवर पत्नीचा गंभीर आरोप
अक्षयच्या पत्नी रुपाली बोऱ्हाडे यांनी पती अक्षय बोऱ्हाडे, सासू सविता बोऱ्हाडे आणि दीर अनिकेत बोऱ्हाडे यांच्याविरोधात विरोधात प्रचंड छळ केल्याचे आरोप केले आहेत. या सर्वांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्रास दिला तसेच वेळोवेळी रिव्हॉलवरची वा गुंडांची धमकी देत शारीरिक आणि मानसिक छळ केला. 

अनेक मुलींसोबत अनैतिक संबंध... 
अनेक मुलींसोबत अनैतिक संबंध ठेवत फसवणूक केल्याची आरोप त्याच्या पत्नीने तक्रारीत केले आहेत. रुपाली बोऱ्हाडे हीने पती अक्षय आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी तक्रारीनुसार या सर्वांविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे,

Web Title: Rape Crime registred against 'So-called' social worker Akshay Borhade at Junnar police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.