लग्नाचे नाटक करून उद्योजक तरुणीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 01:46 AM2018-10-31T01:46:08+5:302018-10-31T01:49:52+5:30

मुंबईतील पंचतारांकित हॉटेलातील प्रकार; धमकी देऊन ४ लाख उकळले

The rape of an entrepreneur girl by marriage drama | लग्नाचे नाटक करून उद्योजक तरुणीवर बलात्कार

लग्नाचे नाटक करून उद्योजक तरुणीवर बलात्कार

googlenewsNext

पुणे : उद्योजक तरुणीच्या घरातील लोकांसमोर मंगळसूत्र आणि कुंकू लावून लग्न केल्याचा आभास निर्माण करून तिच्यावर मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी बाणेर येथील तरुणावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

अमित रंजन महापात्रा (वय ३०, रा. श्रीपल होम्स, अजिंक्य पार्क, बाणेर) असे या तरुणाचे नाव आहे़. ही घटना ७ जुलै ते ५ आॅक्टोबर २०१८ दरम्यान बाणेर येथील महापात्रा याच्या घरी, तसेच मुंबईतील हॉटेल सन अँड सॅन या ठिकाणी घडली़ याप्रकरणी वानवडीतील २९ वर्षांच्या तरुणीने फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले, की या तरुणीच्या कुटुंबाचा पिढीजात व्यवसाय आहे़. सध्या ती हा व्यवसाय चालविते़. अमित महापात्रा हा काही कामधंदा करीत नाही़. यादरम्यान दोघांची ओळख झाली़ त्याने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले़. आपणही व्यवसाय करणार असल्याचे भासवून तिचा विश्वास संपादन केला़ त्यानंतर त्याने लग्न न करण्याची धमकी देऊन तिच्याकडून वेळोवेळी ४ लाख रुपये घेतले़.

आपले हे नाटक खरे वाटावे, म्हणून त्याने तिच्या घरातील लोकांच्यासमक्ष या तरुणीला मंगळसूत्र घातले व कुंकूही लावले आणि लग्न झाल्याचा आभास निर्माण केला़. या लग्नानंतर त्याने तिला आपल्या बाणेर येथील घरी नेले़. तेथे तसेच मुंबईतील जुहू येथील हॉटेल सन अँड सॅनमध्ये नेले़. तेथे तिच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले़. या बनावट लग्नानंतर तरुणीला त्याचे खरे रूप लक्षात येऊ लागल्यावर त्यांच्यात वाद होऊ लागले़, तेव्हा तो तिला मारहाण व शिवीगाळ करू लागला़. शेवटी या छळाला कंटाळून या तरुणीने वानवडी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता़.

Web Title: The rape of an entrepreneur girl by marriage drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.