अल्पवयीन मुलीवर बलात्कार; अत्याचाराचा बनवला व्हिडीओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:11 AM2021-05-01T04:11:27+5:302021-05-01T04:11:27+5:30
पुणे : एका अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार केल्यानंतर त्या अत्याचाराचा व्हिडीओ बनवून वारंवार शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या ...
पुणे : एका अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार केल्यानंतर त्या अत्याचाराचा व्हिडीओ बनवून वारंवार शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या तरुणावर चतुश्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अण्णा उर्फ सुहास शिंदे (24) या तरुणावर बलात्कार व पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पाषाण येथे रहाणाऱ्या मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने तिला रस्त्याने जात असताना धमकावून जबरदस्तीने बावधान येथील टेकडीवर नेले. तेथे तिचा विनयभंग केला. यानंतर मार्च 2019 मध्ये पीडित मुलीचे आई वडील वॉकिंगसाठी बाहेर गेल्याचे कळताच आरोपी तिच्या घरात घुसला. जबरदस्तीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. याचा त्याने लपून व्हिडीओही बनविला. यानंतर पीडितेला ‘तुला दररोज माझ्यासोबत सेक्स करावा लागेल नाहीतर हा व्हिडिओ तुझ्या आईला दाखवेन’ अशी धमकी दिली. यासंदर्भात त्याने पीडित मुलीच्या मित्राला धमकी देऊन आमच्या दोघांच्यामध्ये पडायचे नाही असे सांगितले. व्हिडिओचा स्क्रिनशॉट इंस्टाग्रॅमवर पाठवून तिला वारंवार त्रास दिला जात आहे. हा प्रकार सन 2017 पासून सुरु होता.