धक्कादायक! शिरूरमध्ये ८ नराधमांकडून महिलेवर बलात्कार, ७ महिन्यांनी घटना उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 09:45 PM2022-01-21T21:45:32+5:302022-01-23T14:23:45+5:30

महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपींनी हे घृणास्पद कृत्य केल्याचे समोर आले आहे

rape of a woman by 8 men in Shirur incident revealed after 7 months | धक्कादायक! शिरूरमध्ये ८ नराधमांकडून महिलेवर बलात्कार, ७ महिन्यांनी घटना उघडकीस

धक्कादायक! शिरूरमध्ये ८ नराधमांकडून महिलेवर बलात्कार, ७ महिन्यांनी घटना उघडकीस

googlenewsNext

पुणे : शिरूर तालुक्यात आठ नराधमांनी ३२ वर्षीय महिलेला वेगवेगळया ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी  आठ जणांवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . माऊली पवार, रज्जाक पठाण, काळु वाळुंज, विठ्ठल काळे, राजेश उर्फ पप्पु गायकवाड, आकाश गायकवाड, संदीप वाळुंज, नवनाथ वाळुंज अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आरोपींविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली असल्याची माहिती शिरूर चे पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिरूर तालुक्यातील एका गावामध्ये ही महिला एकटी राहते. स्वभावाने थोडीशी भोळसट असल्याने आणि तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला या आठ जणांनी त्रास देण्यास सुरुवात केली व शिरूरमध्ये कधी तिच्या घरात, कधी उसाच्या शेतात, शाळेच्या पाठीमागे, नदीकिनारी अशा वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या दिवशी एकएकट्याने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे ती गर्भवती झाली. सहा महिन्यांची गर्भवती झाल्यावर ती कामावर जात असलेल्या शेतामध्ये तिच्या सहकाऱ्यांकडे तिने ही गोष्ट सांगितली. त्यानंतर त्याची चर्चा गावात पसरली. पोलिसांच्या कानावर ही गोष्ट गेल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडे निर्भया पथक पाठविले. निर्भया पथकाने तिला विश्वासात घेऊन सारी माहिती घेतली. अखेर गावातील तिच्या भाऊ- भावजईला विश्वासात घेऊन याबाबत तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार पीडित महिलेच्या भावजईने पोलिसांत तक्रार दिली. गुरुवारी रात्री पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आणि तातडीने आठही जणांना अटक केली. त्यांना आज (शुक्रवारी) न्यायालयात हजर केल्यावर आठही जणांना सात दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पोलीस निरिक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चरापले हे अधिक तपास करत आहेत.

Web Title: rape of a woman by 8 men in Shirur incident revealed after 7 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.