बळजबरीने दारु पाजून दाेन मित्रांचा विधवेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 03:39 PM2019-05-27T15:39:34+5:302019-05-27T15:40:55+5:30

मित्र आजारी असल्याचे सांगत विधवा महिलेला डाेंगरावर नेऊन दारु पाजून बलात्कार केल्याची घक्कादायक घटना समाेर आली आहे.

rape of widow by two friends | बळजबरीने दारु पाजून दाेन मित्रांचा विधवेवर बलात्कार

बळजबरीने दारु पाजून दाेन मित्रांचा विधवेवर बलात्कार

Next

पुणे : मित्र आजारी आहे त्याला तुला भेटायचे आहे असे सांगत विधवेला डाेंगरावर नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. याप्रकरणी 20 वर्षीय विधवेने काेंढवा पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पाेलीस आराेपींचा शाेध घेत आहेत. 

याप्रकरणी कृष्णा बबन जाधव ( रा. गाेंधळेनगर, हडपसर), अक्षय चव्हाण ( रा. उंड्री) यांच्याविराेधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेच्या पतीचे मे 2018 मध्ये निधन झाले आहे. त्यानंतर महिला तिच्या लहान मुलाला घेऊन आईकडे राहण्यास आली हाेती. आराेपी कृष्णा आणि पीडित महिलेची दाेन वर्षापूर्वी आराेपीशी ओळख झाली हाेती. कृष्णा हा हडपसर येथे रिक्षा चालवताे. आराेपी अक्षय हा कृष्णाचा मित्र आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी 4 च्या सुमारास घडली. घटनेच्या दिवशी आराेपी अक्षय याने पीडितेला कृष्णा आजारी असून त्याला तुला भेटायचे आहे असे सांगत पीडितेला डी. पी. राेड येथे बाेलावून घेतले. तेथून ताे पीडितेला गाेंधळेनगर येथे घेऊन गेला. पुढे आराेपी कृष्णा याने मला तुझ्याशी बाेलायचे आहे असे म्हणत पीडितेला दाेघे उंड्री चाैक येथे घेऊन आले. तेथे दाेघांनी दारु विकत घेतली तसेच पीडितेला ब्रम्हा कुमारी विद्यापीठालगतच्या डाेंगरावर घेऊन गेले. तेथे पीडितेला बळजबरीने दारु पाजण्यात आली. पीडितेला गुंगी आल्यानंतर आराेपी कृष्णा आणि अक्षय याने पीडितेवर बलात्कार केला. यावेळी पीडितेला जाग आल्यानंतर तिने आरडा- ओरडा केल्यानंतर काही महिल्या पीडितेच्या मदतीला आल्या. महिला येताच आराेपींनी तेथून पळ काढला. 

दरम्यान आराेपींचा पाेलीस शाेध घेत असून काेंढवा पाेलीस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: rape of widow by two friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.