उसने दिलेले पैसे परत मागितल्याने महिलेवर बलात्कार ; नऱ्हे येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 20:16 IST2019-07-23T20:14:21+5:302019-07-23T20:16:22+5:30
पूर्वी एकाच कंपनीत सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्याने जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित करून बलात्कार केल्याची फिर्याद एका ३५ वर्षीय महिलेने दिली आहे

उसने दिलेले पैसे परत मागितल्याने महिलेवर बलात्कार ; नऱ्हे येथील घटना
नऱ्हे : पूर्वी एकाच कंपनीत सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्याने जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित करून बलात्कार केल्याची फिर्याद एका ३५ वर्षीय महिलेने दिली आहे. याप्रकरणी सुर्जीत चंद्रकांत यादव (वय ३६, रा. तिरुपती अपार्टमेंट, जेएसपीएम कॉलेज जवळ, नऱ्हे, पुणे) यांस सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे.
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये राहत असलेली फिर्यादी महिला व याप्रकरणी असलेला आरोपी सुर्जीत हे दोघेजण पूर्वी मुंबई येथे एका कंपनीत कामास होते. एकत्र काम करत असल्याने त्यांची तिथे मैत्री झाली. याच मैत्रीचे नंतर प्रेमात रूपांतर झाल्याने त्यांच्यात वेळोवेळी शारीरिक संबंध निर्माण झाले होते. दरम्यान स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी आरोपीने फिर्यादी महिलेकडून दहा लाख रुपये घेतले होते. त्यातील तीन लाख पन्नास हजार गूगल पेद्वारे तर उर्वरित रक्कम ही रोखस्वरुपात दिली होती. त्यानंतर सदरची कंपनी बंद पडल्याने आरोपी सुर्जीत हा पुण्यामध्ये नऱ्हे या ठिकाणी रहावयास आला. फिर्यादी महिला पुण्यात आल्यानंतर सुर्जीतकडे दिलेले १० लाख रुपये परत मागितल्याने सुर्जीतने चिडून जाऊन शिवीगाळ करून मारहाण केली तसेच त्याच्याच घरी नेवून माझी इच्छा नसताना जबरदस्तीने बलात्कार केली असल्याची फिर्याद महिलेने केली आहे. हा प्रकार १९ जुलै ते २० जुलै दरम्यान नऱ्हे येथे घडल्याने सुर्जीत यादव यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रुपाली पाटील करीत आहेत.