ठार मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार
By admin | Published: May 9, 2017 03:29 AM2017-05-09T03:29:22+5:302017-05-09T03:29:22+5:30
पाबळ (ता.शिरूर) येथे एका महिलेचे पती कंपनीत कामाला गेलेले असताना एका इसमाने रात्रीच्या सुमारास घरात घुसून त्या महिलेच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
शिक्रापूर : पाबळ (ता.शिरूर) येथे एका महिलेचे पती कंपनीत कामाला गेलेले असताना एका इसमाने रात्रीच्या सुमारास घरात घुसून त्या महिलेच्या लहान मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. महिलेला देखील ठार मारण्याची धमकी दिली असल्याची घटना शनिवारी (दि. ६) रोजी मध्यरात्री घडली.
पती कंपनीत कामावर गेलेले होते तर तिची सासू व एक मुलगी चार ते पाच दिवसांपूर्वी नातेवाईकांच्या लग्नासाठी बाहेरगावी गेलेले होते. त्यामुळे सदर महिला हि रात्रीच्या सुमारास जेवण करून घरातील आवराआवर केली. दरवाजा आतील कडी काढून अमोल घरात घुसला त्या महिलेला मारुन तू जर ओरडली तर तुझ्या मुलाला ठार मारून टाकीन असा दम दिला आणि जबरदस्तीने या महिलेवर बलात्कार केला. यावेळी महिलेने घाबरून उठून लाईट चालू केली असता त्या ठिकाणी अमोल लक्ष्मण पोखरकर हि व्यक्ती असल्याचे पिडीत महिलेच्या निदर्शनास आले. यांनतर घडलेला सर्व प्रकार पिडीत महिलेने तिचे पती व इतर नातेवाइकांना सांगितला या बाबत सदर महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून शिक्रापूर पोलिसांनी अमोल लक्ष्मण पोखरकर रा. लोणी धामणी ता. आंबेगाव जि. पुणे याला रविवारी सकाळी त्यच्या राहत्या घरी अटक केली .