नोकरीच्या शोधात आलेल्या युवतीवर बलात्कार, दोघा सख्ख्या भावांवर बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 01:21 AM2017-11-25T01:21:08+5:302017-11-25T04:56:58+5:30

बारामती : गोंदिया जिल्ह्यातून नोकरीच्या शोधात आलेल्या युवतीवर दोघा भावांनी नोकरीला लावतो, लग्न करतो, असे आमिष दाखवून तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली

Rape of a young woman in search of job, rape of two siblings and crime of acutoricity | नोकरीच्या शोधात आलेल्या युवतीवर बलात्कार, दोघा सख्ख्या भावांवर बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

नोकरीच्या शोधात आलेल्या युवतीवर बलात्कार, दोघा सख्ख्या भावांवर बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

Next

बारामती : गोंदिया जिल्ह्यातून नोकरीच्या शोधात आलेल्या युवतीवर दोघा भावांनी नोकरीला लावतो, लग्न करतो, असे आमिष दाखवून तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तसेच आरोपींनी फिर्यादी युवतीला जातिवाचक बोलून अपमानित करून शिवीगाळ केली आहे. या प्रकरणी दोघा भावांवर बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या युवतीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ही युवती आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये ही युवती बारामतीत कामासाठी आली होती. आरोपी अमोल राघू म्हेत्रे व रवी राघू म्हेत्रे (दोघे रा. काझड बोरी, ता. इंदापूर) यांनी संगनमत केले. अमोलने फिर्यादीस नोकरी लावतो व लग्न करतो, असे आमिष दाखविले. तसेच आरोपी रवीने फिर्यादीस जिवे मारण्याच्या धमक्या देऊन वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला. अमोलने गर्भपाताच्या गोळ्या देऊन तीचा गर्भपात केला. तसेच दोघा आरोपींनी युवतीला जातिवाचक बोलून शिवीगाळ केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दोघांवर बलात्कार तसेच अ‍ॅट्रॉसीटीचा गन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अमोलला अटक करण्यात आली आहे. तर रवि फरारी आहे. न्यायालयासमोर या आरोपीला हजर केले असता अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.बी देशपांडे यांनी अमोल यास चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
>जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार
बारामती : वारंवार भीती दाखवून जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकारातून अल्पवयीन मुलगी दोन महिन्यांची गर्भवती झाली आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी रतन रामदास हेगडे (रा. अनंतआशानगर, बारामती) या आरोपीवर बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीचे वय १२ वर्षे ९ महिने आहे. नोव्हेंबर २०१६ ते १७ नोव्हेंबर २०१७ दरम्यान, हा प्रकार घडला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षा जगदाळे करीत आहेत.

Web Title: Rape of a young woman in search of job, rape of two siblings and crime of acutoricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.