धरणांतील साठय़ात वेगाने घट

By Admin | Published: November 26, 2014 11:23 PM2014-11-26T23:23:51+5:302014-11-26T23:23:51+5:30

शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा वेगाने घटू लागल्याने महापालिका प्रशासनची चिंता वाढली आहे.

Rapid decline in damages | धरणांतील साठय़ात वेगाने घट

धरणांतील साठय़ात वेगाने घट

googlenewsNext
पुणो : शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा वेगाने घटू लागल्याने महापालिका प्रशासनची चिंता वाढली आहे. पाणीवाटपासाठी कालवा समितीची रखडलेली बैठक आणि पाणीवाटपाबाबत पाटबंधारे विभागात असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे ही स्थिती उद्भवली असून मार्चपासून पुणोकरांना पुन्हा एकदा एक वेळ पाणीकपातीचा सामना करावा लागेल. या प्रकल्पांमध्ये सध्या सुमारे 24.16  टीएमसी पाणी आहे. तर मागील वर्षी याच महिन्यात या प्रकल्पात सुमारे 28 टीएमसी पाणी होते. त्यामुळे यंदा कपात अटळ असल्याची भिती महापालिकेच्या एका वरिष्ट अधिका-याने व्यक्त केली आहे. 
शहरात मार्च 2क्12  पासून एकवेळ पाणी देण्यात येत होते. यावर्षी  राज्यात वेळेवर हजेरी लावणा-या मान्सूने मात्र दडी मारली होती. त्यामुळे जून  2क्14 च्या अखेरीस  प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये अवघे 2 टीएमसी पाणी उरले होते. त्यामुळे 28 जून पासून महापालिकेने शहरात दोन वेळ सुरू असलेल्या पाण्यात 12 टक्के कपात करून पाणी पुरवठा एकवेळ सुरू केला होता.
 
4 सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात ही धरणो 1क्क् टक्के भरली होती. त्यानंतही अधून मधून पाऊस सुरूच असल्याने ऑक्टोबर अखेरीस या धरणात 27.3क् र्पयत या धरणात 1क्क् टक्के पाणीसाठा होता. 
4मात्र, याच कालावधीत सरकार बदल झाल्याने तसेच विधानसभेची आचारसंहिता असल्याने धरणातील पाणीवाटपासाठी होणारी कालवा समितीची बैठक झाली नाही. 
4दरम्यानच्या कालावधीत पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठीचे आर्वतन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने घटू लागला आहे. 
4त्यातच समितीची बैठक केव्हा होईल याबाबत शास्वती नाही. त्यामुळे महापालिकेस ऑगस्ट 2क्15 र्पयतचे नियोजन करावयाचे झाल्यास उपलब्ध पाण्यातील सुमारे 12 ते 13  टीएमसी पाण्याची गरज भासणार आहे. 
 
पाणीकपात अटळ
या चारही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने ऑगस्ट 2क्14 पासून शहरात महापालिकेकडून दोन वेळ पाणी पुरवठा  करण्यात येत आहे. त्यासाठी दरमहा पालिकेस 1.25 टीएमसी पाणी लागते. कालवा समितीच्या बैठकीत शहरासाठी जुलै अखेर र्पयतचा पाणीसाठा राखीव ठेवण्यात येतो. मात्र, गेल्या काही वर्षात दरवर्षीच पाऊस उशीरा सुरू होत असल्याने या वर्षी 15 ऑगस्ट 2क्15 र्पयतचा पाणीसाठा राखीव ठेवण्याची महापालिकेची भूमिका आहे. त्यानुसार, पालिकेस पुढील नऊ महिन्यांसाठी 12 ते 13 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. पण प्रत्यक्षात पाटबंधारे विभागाकडून पालिकेस वर्षभरासाठी एवढा साठा दिला जातो. 
 

 

Web Title: Rapid decline in damages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.