हॉटस्पॉट ठरलेल्या गावामध्ये रॅपिड टेस्ट होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:11 AM2021-04-04T04:11:25+5:302021-04-04T04:11:25+5:30

कोरोना हॉटस्पॉट ठरले आहे. वरवंड गावाबरोबर पडवी, कडेठाण हे गावे हॉटस्पॉटच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी ...

Rapid tests are required in hotspot villages | हॉटस्पॉट ठरलेल्या गावामध्ये रॅपिड टेस्ट होणे गरजेचे

हॉटस्पॉट ठरलेल्या गावामध्ये रॅपिड टेस्ट होणे गरजेचे

Next

कोरोना हॉटस्पॉट ठरले आहे. वरवंड गावाबरोबर पडवी, कडेठाण हे गावे हॉटस्पॉटच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जशी रॅपिड अँटिजन तपासणी घरोघरी जाऊन केली होती तशी ती यंदाही करावी अशी मागणी होत आहे.

मागील वर्षी वरवंड गावामध्ये रॅपिड अँटिजन तपासणी करण्यात आली २ हजार ९६८ कुटुंबाची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली होती. यामध्ये शरीराचे तापमान व ऑक्सिजन मशीनद्वारे तपासणी करण्यात आली होती, यामध्ये १५० च्या आसपास, संशयित रुग्ण जागेवरच सापडले होते त्यामुळे रुग्णवाढ कमी झाली होती.

सध्या तालुक्यातील कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे तालुक्यातील सर्व कोविड सेंटर फुल झाले आहे. नुकतेच वरवंड येथे कोविड सेंटर चालू करण्यात आले आहे. तरीही नागरिक स्वतःहून तपासणीसाठी येत नसल्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे रॅपिड अँटिजन तपासणी करण्याची गरज आहे. वरवंडबरोबर पाटस, यवत, कडेठान, पडवी, केडगाव, पारगाव, अशा मोठ्या गावा

मध्ये रॅपिड अँटिजन तपासणी होणे गरजेचे आहे.

--

कोट

वरवंड गावामध्ये रुग्णसंख्या वाढत असून नागरिक अजून तपासणीसाठी स्वत:हून पुढे येत नाही यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. ज्या रुग्णांचा समर्पक कोरोना रुग्णांशी आला आहे, अशा रुग्णांनी व ज्यांना लक्षणे आहेत अशानी वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याशी सपर्क साधावा.

- डॉ. शिवानी पांचाळ,

आरोग्य अधिकारी

--

चौकट

मागील वर्षी वरवंड गावामध्ये रॅपिड ॲंटिजन तपासणी करण्यात आली त्यामध्ये २ हजार ९६८ कुटुंबांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली होती. यामधे १५० च्या आसपास रुग्ण सापडले होते जर अशी तपासणी करण्यात आली तर असे संशयित रुग्ण सापडतील ज्या रुग्णांना त्रास होत आहे त्यानी तत्काळ आरोग्य केंद्र वरवंड यांच्याशी संपर्क

साधावा.

- किशोर दिवेकर, पोलीस पाटील

Web Title: Rapid tests are required in hotspot villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.