दुर्मीळ घटना: खरपुडी येथे जर्सी गायला जुळी वासरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:10 AM2021-04-17T04:10:20+5:302021-04-17T04:10:20+5:30
खरपुडी येथील माजी उपसरपंच विलास चौधरी या कृतिशील शेतक-याने दुधाचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी त्यांनी ५ देशी व ...
खरपुडी येथील माजी उपसरपंच विलास चौधरी या कृतिशील शेतक-याने दुधाचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी त्यांनी ५ देशी व ३० जर्सी गायी विकत घेतल्या आहेत. सोबत काही म्हशीही दुग्ध व्यवसायासाठी त्यांनी घेतल्या आहेत. त्यातील एका जर्सी गायीने एकाच वेळी दोन वासरांना जन्म दिला. ही दोन्ही वासरे एकाच रंगांची आहेत. एकाच वेळी दोन वासरे जन्माला येणे ही लाखातील एखादी घटना असल्याचे रेटवडी येथील पशुवैद्यकीय डॉ. दीपक चव्हाण यांनी सांगितले. यातील एक वासरू १२ किलो तर दुसरे ११ किलो वजनाचे असून दोन्ही वासरे व गाय सुदृढ व सुखरूप आहेत. सकस आहार, योग्य निगा आणि वेळेवर औषधोपचार या त्रिसूत्रीचा वापर करून केलेले संगोपन आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतलेली गाईची गर्भावस्थेतील विशेष काळजी यामुळे ही गाय व दोन्ही वासरे ठणठणीत असून, ती दररोज १५ ते १८ लिटर दूध देते आहे. साधारणपणे ५ टक्के गायींमध्ये जुळे होण्याची शक्यता असते. गुणसूत्रांमधील बदल व अनुवंशिकता या घटकांचा यावर परिणाम होतो. अशा गायी या आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतात असेही ते म्हणाले.
१६दावडी वासरू