दुर्मिळ नील मयूरेश्वर फुलपाखराचे वेताळ टेकडीवर दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:10 AM2021-05-19T04:10:25+5:302021-05-19T04:10:25+5:30

पुणे : वेताळ टेकडीवर (एआरएआय) अतिशय दुर्मिळ आणि पहिल्यांदाच नील मयूरेश्वर (Plain Blue Royal) हे फुलपाखरू आढळून आले ...

Rare Neel Mayureshwar butterfly sighting on Vetal hill | दुर्मिळ नील मयूरेश्वर फुलपाखराचे वेताळ टेकडीवर दर्शन

दुर्मिळ नील मयूरेश्वर फुलपाखराचे वेताळ टेकडीवर दर्शन

googlenewsNext

पुणे : वेताळ टेकडीवर (एआरएआय) अतिशय दुर्मिळ आणि पहिल्यांदाच नील मयूरेश्वर (Plain Blue Royal) हे फुलपाखरू आढळून आले आहे. त्यामुळे टेकडीवर या फुलपाखराचे खाद्य असणाऱ्या वनस्पती मोठ्या प्रमाणावर असल्याचे स्पष्ट होत आहे. कारण यापूर्वी हे फुलपाखरू येथे दिसले नव्हते. दक्षिण भारत आणि मुंबई, ठाणे परिसरात दिसून येतेे. पुणे परिसर हे फुलपाखरू दिसत नसल्याचेही संशोधकांचे म्हणणे आहे.

शहरातील प्रसिद्ध एआरएआय टेकडी नैसर्गिक सौंदर्याने नटलेली असून, निसर्ग अभ्यासकांची येथे रेलचेल असते. एआरएआय टेकडी ही असंख्य वन्यजीवांचा महत्त्वाचा अधिवास आहे. त्यात फुलपाखरांचा समावेश असून, येथे सुमारे ८७ प्रकारची विविध फुलपाखरांची दुनिया पहायला मिळत आहे. याबाबतचे निरीक्षण फुलपाखरू अभ्यासक विद्यार्थ्यांनी नोंदवली आहे. त्यात रजत जोशी (फग्युर्सन महाविद्यालय), अद्वैत चौधरी (एमआयटी), अथर्व बापट (एमआयटी), स्वानंद ओक (हॉस्पिटालिटी सायन्स), कल्याणी बावा (फग्युर्सन महाविद्यालय) यांचा सहभाग आहे. यांनी २०१७ पासून टेकडीवर फुलपाखरांच्या अभ्यासाला सुरुवात केली. चार वर्षांमध्ये येथे निरीक्षण करून सुमारे ८७ फुलपाखरांच्या प्रजाती दिसल्याची नोंद केली. रजत फर्ग्युसन महाविद्यालयात एमएस्सी पर्यावरणीय विज्ञानाचा विद्यार्थी आहे.

—————————-

कोणत्या प्रकारची फुलपाखरे आढळतात

टेकडीवरती गवताळ प्रदेशात वाढणारी खुरटी झाडे व गवताच्या काही प्रजाती आढळतात. सगळ्यात जास्त फुलपाखरे पावसानंतर अर्थात सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत टेकडीवरती दिसतात.

—————————————-

खाद्य वनस्पतीची झाडं

टेकडीवरती बरीच खुरटी झाडं फुलपाखरांसाठी उपयुक्त खाद्य वनस्पती आहेत. त्यातील प्रमुख वनस्पती म्हणजे बाभूळ (बाबुल ब्ल्यू फुलपाखरांसाठी) केपॅरिस, कडबा, खैर, रुई, वट्टिका अश्या वनस्पतींचा समावेश आहे.

—————————————

मकरंद देणारी वनस्पती

टेकडीवरती पूर्णपणे पसरलेली Lantana camera म्हणजे टणटणी हे तिथल्या फुलपाखरांचे प्रमुख नेक्टर प्लांट आहे. यासोबतच टेकडीवरील आढळणारी बाभूळ, केपॅरिस ही पण महत्त्वाची झाडं आहेत.

- रजत जोशी

————————

नील मयूरेश हे फुलपाखरू पुणे परिसरात दिसत नाही. ते वेताळ टेकडीवर आढळले आहे, तर तेथील वातावरण या फुलपाखरांसाठी पोषक आहे. त्यांचे खाद्य असणाऱ्या वनस्पतींची वाढ येथे असेल, म्हणून त्यांचा वावर दिसतोय.

- डॉ. अंकुर पटवर्धन, फुलपाखरू संशोधक व प्रमुख, अण्णासाहेब कुलकर्णी जैवविविधता विभाग, गरवारे महाविद्यालय

——————————

Web Title: Rare Neel Mayureshwar butterfly sighting on Vetal hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.