दुर्मीळ असणारी 'हंस' फुले आढळली, सुमारे १३६ वर्षांनंतर दिसल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 06:42 PM2020-06-23T18:42:56+5:302020-06-23T18:45:33+5:30

जगात फक्त हंस फुलांचा आढळतो सिक्कीममध्येच अधिवास

Rare swan flowers were found, claimed to have appeared about 136 years later | दुर्मीळ असणारी 'हंस' फुले आढळली, सुमारे १३६ वर्षांनंतर दिसल्याचा दावा

दुर्मीळ असणारी 'हंस' फुले आढळली, सुमारे १३६ वर्षांनंतर दिसल्याचा दावा

googlenewsNext

पुणे : अतिशय दुर्मिळ आणि प्रदेशनिष्ठ ग्लोबा अंडरसोनी ही वनस्पती सिक्किम येथील पर्वतरांगांमध्ये आढळून आली आहे. तिला डान्सिंग लेडीज किंवा स्वॉन फ्लॉवर्स म्हटले जाते. तिचा आकार हंसासारखा दिसतो. ही वनस्पती जगात फक्त सिक्किममध्ये असून, यापूर्वी १३६ वर्षांपूर्वी आढळून आली होती. वनस्पती अभ्यासक डॉ. सचिन पुणेकर यांचा या कामात सहभाग आहे. 
अतिधोकाग्रस्त वनस्पतीमध्ये हिचा समावेश झालेला आहे. झिंगीबेरासी म्हणजेच आद्रक, हळद या कुटुंबातील ती वनस्पती आहे. या संदर्भातील लेख ‘बॉटनी लेटर्स’ या जागतिक पत्रिकेत नुकताच प्रसिध्द झाला आहे. जयकृष्णन थाचट, वडाखूट शंकरन हरिश आणि ममियिल साबू आणि सचिन पुणेकर यांनी यावर संशोधन केले आहे.  सिक्किम आणि दार्जालिंग पर्वतरांगातच ही वनस्पती दिसून येते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून ती गायब झाली होती. यापूर्वी स्कॉटिस बॉटनिस्ट थॉमस अ‍ॅँडरसन यांनी १८६२ मध्ये संकलन केले होते. त्यानंतर 
१८७५ मध्ये ब्रिटिश बॉटनिस्ट सर जॉर्ज किंग यांना आढळून आली होती. अतिशय घनदाट जंगल आणि खडकावर तिचा अधिवास आहे. गेल्या काही वर्षांपासून सिक्किम येथील पर्वतरांगामध्ये रस्तारुंदीकरणात ही वनस्पती नष्ट होत आहे. 
===============


वनस्पतीचे महत्त्व 
ग्लोबा अंडरसोनी या वनस्पतीचे जागतिक स्तरावर महत्त्व असून, अतिशय संवेदनशील जैवविविधता असणाऱ्या या ठिकाणी आढळते. कोख्या मधमाशीसाठी यांचे ते अन्न आहेत.
=================
सध्या रस्तारुंदीकरणामुळे अनेक वनस्पती नष्ट होत आहेत. राष्ट्रीय महामार्ग समितीने कुठेही रस्ता करायचा असेल, तर स्थानिक पातळीवरील जैवविविधता जाणकारांशी बोलून ठरवायला हवे. अन्यथा अनेक दुर्मिळ वनस्पती नष्ट होत आहेत. 
- डॉ. सचिन पुणेकर, वनस्पती संशोधक 
=========================

Web Title: Rare swan flowers were found, claimed to have appeared about 136 years later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.