Rashmi Shulka | रश्मी शुक्लांनी 'फोन टॅपिंग'साठी घेतली नव्हती शासनाची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 10:43 AM2022-03-01T10:43:46+5:302022-03-01T10:51:35+5:30

पुणे : अंमली पदार्थाच्या टोळीचे रॅकेट उघडकीस आणण्याचे कारण सांगून परवानगी न घेताच तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला ...

rashmi shakla did not seek government permission for telephone tapping crime news | Rashmi Shulka | रश्मी शुक्लांनी 'फोन टॅपिंग'साठी घेतली नव्हती शासनाची परवानगी

Rashmi Shulka | रश्मी शुक्लांनी 'फोन टॅपिंग'साठी घेतली नव्हती शासनाची परवानगी

Next

पुणे : अंमली पदार्थाच्या टोळीचे रॅकेट उघडकीस आणण्याचे कारण सांगून परवानगी न घेताच तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (rashmi shukla) यांनी ग्राहक अर्ज आवेदन पत्र अपर मुख्य सचिव गृह यांच्यासमोर प्रस्तूत केलेले नाही. अन्यथा अभिवेक्षणाची (phone tapping) परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यास कोणाचा मोबाईल क्रमांक अभिवेक्षणाकरीता मागविण्यात आला आहे, याची कल्पना आली असती. तसेच माेबाईल वापरकत्यांची नावे सुद्धा अभिवेक्षणाची व फेर अभिवेक्षणाची मंजुरी घेताना सादर केली नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

पुणे पोलीस आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन खासदार नाना पटोले, संजय काकडे, आमदार बच्चु कडु, आशिष देशमुख यांचे मोबाईल नंबर अनिष्ट राजकीय हेतूने जाणीवपूर्वक फसवणूक करुन अभिवेक्षणाखाली घेतले आणि हेतू पुरस्पर अभिवेशन चालू ठेवले होते. त्यामुळे रश्मी शुक्ला व इतरांविरुद्ध भारतीय तार अधिनियम कलम २६ प्रमाणे बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई शहर, ठाणे शहर, नवी मुंबई, पुणे शहर आणि नागपूर शहर यांच्याकडील अभिवेक्षणाचे प्रस्ताव हे राज्य गुप्त वार्ता आयुक्तांमार्फत न पाठविता परस्पर अपर मुख्य सचिव गृह यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविले जातात.
पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या समितीने २०१५ ते २०१९ या कालावधीतील सर्व पोलीस आयुक्तालयातील फोन टॅपिंगची पडताळणी केली. त्यात पुणे पोलीस आयुक्तालयात २०१७ ते २०१८ या कालावधीत ४ लोकप्रतिनिधींचे ६ मोबाईल टॅपिंग करण्यात आल्याचे आढळून आले.

नाना पटोले, बच्चु कडु व आशिष देशमुख हे अंमली पदार्थाच्या अवैध विक्रीत गुंतलेल्या व्यक्ती असल्याचे नमूद करुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ विक्री करीत असल्याचे कारण सांगून फोन टॅपिंग केले. तर संजय काकडे हे कुख्यात गुंड बापू नायर टोळीचा सदस्य असल्याचे दाखवून ते अनाधिकाराने जमीन बळकाविणे, खंडणी, दरोडा असे गुन्हे संघटितपणे करीत असल्याचे म्हटले होते.

तत्कालीन खासदार नाना पटोले आणि आमदार बच्चु कडु यांचे १८ ऑगस्ट २०१७ ते १४ नोव्हेंबर २०१७ दरम्यान टॅपिंग केला. खासदार संजय काकडे यांचे दोन फोन आणि आमदार आशिष देशमुख यांचा फोन १३ नोव्हेबर २०१७ ते ९ जानेवारी २०१८ या कालावधीत टॅपिंग केले.

बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणात संबंधितांची अगोदर चौकशी करण्यात येईल. या चौकशीतून ज्या बाबी समोर येतील. त्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
-अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे

Web Title: rashmi shakla did not seek government permission for telephone tapping crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.