महायुतीच्या प्रचारापासून रासप राहणार दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 07:29 PM2019-10-06T19:29:06+5:302019-10-06T19:30:43+5:30

रासपच्या उमेदवारांना भाजपाचा एबी फाॅर्म देण्यात आला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

rashtriya samaj paksh will be aside from prachar of alliance | महायुतीच्या प्रचारापासून रासप राहणार दूर

महायुतीच्या प्रचारापासून रासप राहणार दूर

googlenewsNext

बारामती : मित्रपक्षांना कमळ चिन्हावरच लढण्याचा आग्रह भाजपने धरला आहे. यामुळे महायुतीमधील महत्त्वाचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारापासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी (दि.७) मुंबई नरीमन पॉइंट येथील पक्ष कार्यालयात राज्य पक्ष कार्यकारिणची तातडीने बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीतच रासपची पुढील दिशा ठरणार आहे. 

महायुतीच्या जागावाटपामध्ये रासपला जिंतूर व दौंड हे दोन विधानसभा मतदारसंघ देण्यात आले आहेत. मात्र, येथील उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत रासपचा एबी फॉर्म न जोडता भाजपचा एबी फॉर्म जोडल्याने कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. याबाबत, माहिती देताना रासपचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे-पाटील म्हणाले, भाजपच्या चिन्हावर निवडणूक न लढवण्याची रासपची सुरुवातीपासूनच भूमिका राहिली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत युती झाली नसल्याने रासपने सहा जागांवर विधानसभा लढवली होती. यंदा महायुतीचा महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या रासपच्या वाट्याला २ जागा आल्या आहेत. मात्र, येथील दोन्ही उमेदवारांना पक्षाचे एबी फॉर्म देण्यात आले होते. मात्र, या उमेदवारांनी भाजपचे एबी फॉर्म कसे भरले,याबाबत माहिती घेण्यात येईल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. ते म्हणाले, भाजपचे एबी फॉर्म रासपच्या उमेदवारांना कसे मिळाले याबाबत माहिती घेतली जाईल. मात्र, झाल्या प्रकाराने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असून सर्व कार्यकर्ते सध्यातरी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारापासून सध्यातरी दूर आहेत.

सोमवारी रासप अध्यक्ष महादेव जानकर यांच्या उपस्थितीत मुंबई येथील पक्षकार्यालयामध्ये होणाऱ्या बैठकीत पक्षाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. याबाबत रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर बारामती येथील महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीमुळे जानकर यांना कोणताही शह बसला नसल्याचे दांगडे-पाटील यांनी सांगितले. महादेव जानकर हे एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून दुसऱ्या फळीतील एका कार्यकर्त्याच्या उमेदवारीमुळे त्यांना शह बसल्याच्या चर्चा निरर्थक आहेत. भाजपदेखील अशा प्रकारची खेळी करणार नाही, असेही दांगडे-पाटील यांनी स्पष्ट केले.  

Web Title: rashtriya samaj paksh will be aside from prachar of alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.