रसिकलाल धारिवाल यांचे सामाजिक योगदान मोठे : पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:12 AM2021-09-03T04:12:35+5:302021-09-03T04:12:35+5:30
जनाई शिरसाई उपसा सिंचन व पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी मोठ्या व्यासाच्या आरसीसी पाईपलाईनद्वारे मौजे वढाणे तलाव व मौजे ...
जनाई शिरसाई उपसा सिंचन व पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी मोठ्या व्यासाच्या आरसीसी पाईपलाईनद्वारे मौजे वढाणे तलाव व मौजे वाकी येथील तलावात सोडण्यात आले. या योजनेचे उद्घाटनानिमित्त अजित पवार व रसिकलाल धारिवाल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा आर. धारिवाल यांच्या हस्ते जलपूजन करून करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी मंचावर राष्ट्रवादी कााँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, कानेटकर उपस्थित होते.
पवार म्हणाले, की वढाणे तलाव जनाईच्या पाण्याने भरण्याची वढाणेकरांची, तर पुरंदर सिंचन योजनेचे पाणी वाकी तलावात सोडण्याची वाकीकरांची खूप जुनी मागणी होती. त्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी शोभा धारिवाल यांच्याकडे यासाठी सहकार्याची भावना व्यक्त केली होती. त्याला प्रतिसाद देताना शोभा धारिवाल यांनी ६७ लाख रुपयांचा निधी जलसंधारण विभाग यांना दिला, त्यातून ही योजना मार्गी लागली आणि दोन्ही तलाव भरल्याने आजूबाजूच्या पंधरा ते वीस गावांतील लोकांना या योजनेचा फायदा होणार आहे. पाण्याच्या या योजनेमुळे महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार आहे आणि गावात टॅंकरची गरज पडणार नाही. तसेच भूजल पातळीमध्ये वाढ होऊन शेततळे, विहिरी भरून जनवरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे.
या वेळी गावकऱ्यांनी आरएमडी फाउंडेशनचे आभार मानले व शोभा धारिवाल यांचा सत्कार केला.
--
०२ पुणे धारिवाल ग्रूप