स्व. रसिकलाल धारिवाल यांना ‘सोनेरी महाराष्ट्र’च्या वतीने मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:41 PM2018-01-31T12:41:06+5:302018-01-31T12:43:53+5:30
जैन समाजाचे दानशूर, सामाजिक, धार्मिक, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्व. रसिकलाल धारिवाल यांना सोनेरी महाराष्ट्रच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार २०१८ अंतर्गत मरणोत्तर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुणे : जैन समाजाचे दानशूर, सामाजिक, धार्मिक, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्व. रसिकलाल धारिवाल यांना सोनेरी महाराष्ट्रच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार २०१८ अंतर्गत मरणोत्तर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
याप्रसंगी उद्योजक कृष्णकुमार गोयल, उद्योजक किशोर खाबिया, हुकमीचंद चोरडिया, विश्वसुंदरी ईशा अग्रवाल, संपादक राजेश अग्रवाल, डॉ. उषा खाबिया उपस्थित होते.
आपाआपल्या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान सोहळा अण्णा भाऊ साठे सभागृहामध्ये संपन्न झाला. सुहाना मसालेचे संचालक विशाल चोरडिया, गोयल गंगा गु्रपचे संचालक अमित गोयल यांना आयकॉन आॅफ महाराष्ट्र, बेंजर पेंटचे प्रदीप अग्रवाल,
बुधानी वेफर्सचे अरविंद बुधानी, सज्जनकुमार तुलस्यान, प्रेमचंद मित्तल, नितीन अग्रवाल, शुभांगी गोळे, प्रमोद ओसवाल यांना टाटा बिर्ला उद्योगरत्न, विश्वसुंदरी व अभिनेत्री ईशा अग्रवाल यांना राइजिंग स्टार, विनोद सांकला, मिसेस महाराष्ट्र श्रेया तुपे, संदीप गादिया यांना युवा समाजरत्न, खेळाडू मेघा अग्रवाल, उमेश मांडोत, संजय कांबळे यांना युवारत्न, मंजीत सिंह विरदी, जगदीश अग्रवाल, ओम सिंह भाटी, जयप्रकाश पुरोहित, देवीचंद अग्रवाल, डॉ. राजेंद्र अग्रवाल, सुमन अग्रवाल, मोहन मांडोत जैन, डॉ. संतोष अग्रवाल, अॅड. महेश अग्रवाल, अॅड. आनंदप्रकाश अग्रवाल, भीमसेन अग्रवाल यांना समाजभूषण, जी. जी. इंटरनॅशनल स्कूलला बेस्ट स्कूल आॅॅफ पिंपरी-चिंचवड, ज्योतिषी निरंजन मित्तल यांना अॅक्सिलेंट अॅस्ट्रॉलॉजर, राजेंद्र सरग यांना कार्टूनिस्ट आॅफ द ईयर-२०१७ तसेच माईचंद गुप्ता व रामपाल तंवर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.