रासप पंकजा मुंडे यांच्या पाठीशी

By admin | Published: June 29, 2015 11:36 PM2015-06-29T23:36:49+5:302015-06-29T23:36:49+5:30

महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बिनबुडाचे आरोप करीत आहेत. तेव्हा राष्ट्रीय समाज पक्ष पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीर उभा राहील.

Rasp Pankaja Munde backed | रासप पंकजा मुंडे यांच्या पाठीशी

रासप पंकजा मुंडे यांच्या पाठीशी

Next

दौंड : महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बिनबुडाचे आरोप करीत आहेत. तेव्हा राष्ट्रीय समाज पक्ष पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीर उभा राहील. दरम्यान, बिनबुडाचा आरोप करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा रासपच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.
या निषेधाचे पत्र तहसीलदार उत्तम दिघे यांना देण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष हरिष खोमणे यांनी दिली.
गेल्या लोकसभा आणि विधानसभेत मतदारांनी त्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. त्यामुळे सत्तेची चटक लागलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भाजपा आणि मित्र पक्षाचा चांगला कारभार पहावेनासा झाल्याने ही मंडळी पंकजा मुंडे यांच्यावर बिनबुडाचा आरोप करीत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर भाजपचे
ज्येष्ट नेते वासुदेव काळे, रासपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब केसकर, हरिष खोमणे, संदिपान वाघमोडे, विशाल माशाळकर, नागेश बेलुरकर, मोहन पडवळकर, अझरुद्दीन मुलाणी, किरण वाघमोडे, गणेश चोरमले, ज्ञानदेव मेरगळ, रमेश खताळ, ज्ञानदेव ताकवणे, स्वप्निल होले, अविनाश चौगुले यांच्या
सह्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: Rasp Pankaja Munde backed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.