कार्तिकी एकादशी निमित्ताने रताळ्याची मोठी आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:07 AM2021-07-19T04:07:59+5:302021-07-19T04:07:59+5:30

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमधील कांद्याची प्रचंड आवक वाढल्याने बाजारभाव घसरले. ...

Ratali's big arrival on the occasion of Karthiki Ekadashi | कार्तिकी एकादशी निमित्ताने रताळ्याची मोठी आवक

कार्तिकी एकादशी निमित्ताने रताळ्याची मोठी आवक

Next

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमधील कांद्याची प्रचंड आवक वाढल्याने बाजारभाव घसरले. तळेगाव बटाट्याची आवक वाढल्याने भावात घट झाली. भुईमूग शेंगाची आवक वाढली तर लसणाची आवक वाढूनही भावही स्थिर राहिले. हिरव्या मिरचीची प्रचंड आवक झाली.

वांगी, भेंडी, कारली, ढोबळी मिरची, गवार, दुधी भोपळा, काकडी या फळभाज्यांची आवक वाढल्याने बाजारभावात घसरण झाली.

पालेभाज्यांच्या बाजारात मेथी,कोथिंबीर व शेपू भाजीची आवक घटली. जनावरांच्या बाजारात बैल, जर्शी गाय, म्हैसीच्या संख्येत घट झाली तर बकरी ईदमुळे बोकडांच्या संख्येत मोठी वाढ झाली. कार्तिकी एकादशी निमित्ताने रताळ्याची आवक झाली. एकूण उलाढाल ३ कोटी ४० लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ३,००० क्विंटल झाली. मागील शनिवारच्या तुलनेत २,००० क्विंटलने वाढल्याने भावात २०० रुपयांची घसरण झाली. कांद्याचे भाव २,००० रुपयांवरून १८०० रुपयांवर आले. तळेगाव बटाट्याची एकूण २,००० आवक क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक ११०० क्विंटलने वाढल्याने १०० रुपयांनी भाव घटले.

बटाट्याचा बाजारभाव १,६०० रुपयांवरुन १,४०० रुपयांवर आले. भुईमूग शेंगांची २७ क्विंटल आवक झाली. लसणाची एकूण आवक ३८ क्विंटल झाली असून ९,००० रुपये बाजारभाव मिळाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक २४३ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ३,००० ते ४,००० रुपये असा भाव मिळाला.

शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे:

कांदा - एकूण आवक - ३,००० क्विंटल. भाव क्रमांक १. १,८०० रुपये, भाव क्रमांक २. १,५०० रुपये, भाव क्रमांक ३. १,२०० रुपये.

बटाटा - एकूण आवक - २,००० क्विंटल. भाव क्रमांक १. १,४०० रुपये, भाव क्रमांक २. १,१०० रुपये, भाव क्रमांक ३. ८०० रुपये.

फळभाज्या

चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती दहा किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -

टोमॅटो - १४८ पेट्या (६०० ते १,२०० रू.). कोबी - ११२ पोती ( ६०० ते १,२०० रू.). फ्लॉवर - १३६ पोती (५०० ते १,२०० रु.),वांगी - ६२ पोती (१,००० ते २,००० रु.). भेंडी - ४६ पोती (१,५०० ते २,५०० रु.),दोडका - ३. पोती (२,००० ते ३,००० रु.). कारली - ४६ डाग (२,००० ते ३,००० रु.). दुधीभोपळा - ३. पोती (१,००० ते १,२०० रु.),काकडी - ४२ पोती (५०० ते १,५०० रु.). फरशी - १. पोती (३,००० ते ५,००० रु.). वालवड - २. पोती (२,५०० ते ३,५०० रु.). गवार - ५८ पोती (२,००० ते ३,००० रू.). ढोबळी मिरची - ३. डाग (१,५०० ते २,५०० रु.). चवळी - १. पोती (२,०००) ते ३,००० रुपये). वाटाणा - ४० पोती (४,००० ते ५,००० रुपये ). शेवगा - १. पोती (३,५०० ते ४,५०० रुपये). गाजर - ३. पोती (१,५०० ते २,५०० रु.).

पालेभाज्या

राजगुरूनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची ८५ हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला ४०० ते ७०० रुपये प्रतीशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीरीची ६५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना ३०० ते ७०० रुपये एवढा भाव मिळाला. शेपूची ७००० जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ३०० ते ६०० रुपये भाव मिळाला. पालकची काहीही आवक झाली नाही.

चाकण येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे -

मेथी - एकूण २. लाख ४३० हजार जुड्या (५०० ते ८०० रुपये). कोथिंबीर - एकूण ३. हजार ९५० जुड्या (३०० ते ६०० रुपये). शेपू - एकुण ७ हजार ५२० जुड्या ( ३०० ते ६०० रुपये). पालक - एकूण ३ हजार १५० जुड्या (५०० ते ७०० रुपये).

जनावरे

चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या दोन जर्शी गायींपैकी एका गायीची विक्री झाली. (१२,००० ते ६,५००० रुपये). ४५ बैलांपैकी ३. बैलांची विक्री झाली.(१०,००० ते ३,५००० रुपये ). तीन म्हशींपैकी एका म्हशीची विक्री झाली. (२०,००० ते ७,०००० रुपये). शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ५३५० शेळ्या - मेंढ्यापैकी ४१५० मेंढ्यांची विक्री झाली.(२,००० ते ४०,००० ). ------------------

१८ चाकण

चाकण बाजारातील आडतदार रवींद्र बोराटे यांच्या गाळ्यावर हिरव्या मिरचीची मोठी आवक झाली.

Web Title: Ratali's big arrival on the occasion of Karthiki Ekadashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.