जिल्ह्यात रुग्णवाढीचा वेग कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:12 AM2021-03-07T04:12:08+5:302021-03-07T04:12:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्याही वाढत आहे. शनिवारी पुणे, पिंपरी आणि जिल्ह्यात एकूण १ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्याही वाढत आहे. शनिवारी पुणे, पिंपरी आणि जिल्ह्यात एकूण १ हजार ९४४ कोरोनाबाधित आढळले. गेल्या काही दिवसांपासूनचा रुग्ण सापडण्याचा हा सर्वांत मोठा आकडा आहे. ग्रामीण भागातही कोरोना नियमांची पायमंल्ली होत असल्याने रोज ३०० च्या आसपास रुग्ण सापडत असल्याने पुन्हा रुग्णवाढीचा वेग वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महिनाभरापूर्वी आटोक्यात असलेला कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात शनिवारी ९६३ रुग्ण सापडले. तर पिंपरी-चिंचवडमध्ये ५७३ रुग्ण आढळले. ग्रामीण भागात ३४१ रुग्ण कोरोनाबाधित आढळले. जवळपास १ हजार २३५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. तर,४ हजार ७६० सक्रिय रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहेत. दिवसभरात ९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
चाचण्यांचे प्रमाणही वाढले असल्याने रुग्णांच्या आकड्यात रोज वाढ होत आहे. असे असले तरी वाढत्या रुग्णांची ही संख्या चिंतेत भर टाकणारी आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी कोरोनावर नियंत्रण मिळवायला प्रशासनाला यश आले होते. मात्र, पुन्हा रुग्णांची संख्याही वाढत अाहे. नागरिकांनी बाहेर पडताना सर्व कोरोना नियमावलीचे कठोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. असे असले तरी आरोग्याबाबत नागरिक अजुनही बेफिकीरपणे वागत असल्याचे चित्र आहे.