मानांकन टेनिससाठी देशातून १०० खेळाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:14 AM2021-02-26T04:14:17+5:302021-02-26T04:14:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्या वतीने व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली आयोजित अखिल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्या वतीने व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली आयोजित अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी देशभरातून शंभरहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. चौदा वर्षांखालील गटातील देशातल्या शंभरपेक्षा जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.
येत्या २७ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत ही स्पर्धा एमएसएलटीए स्कूल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर खेळली जाणार आहे. स्पर्धेचे संचालक प्रविण झिटे यांनी सांगितले की, मुंबई, पुणे, कोल्हापुर, सांगली, नगर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, सोलापूर, गुजरात, छत्तीसगड येथून स्पर्धेसाठी प्रवेशिका आल्या आहेत. तेजल कुलकर्णी यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
खेळाडूंची मानांकन यादी :
मुले : १. नीरज रिंगणगावकर, २. शौर्य घोडके, ३. स्वराज ढमढेरे, ४. आदित्य आयंगर , ५. अहान शेट्टी, ६. अयान शेट्टी, ७. पृथ्वीराज हिरेमठ, ८. वरद पोळ.
मुली : १. प्रिशा शिंदे, २. देवांशी प्रभुदेसाई, ३. आदिती रॉय, ४. सेरेना रॉड्रिक्स, ५. आर्या बोरकर, ६. सलोनी परिदा, ७. मेहक कपूर, ८. निशिता देसाई