आर‘ती’चा तास, घडविणार इतिहास; तब्बल दीड लाख जणांनी केली नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 04:29 AM2017-08-27T04:29:11+5:302017-08-27T04:29:26+5:30

महिलाशक्तीचा सन्मान करण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने आयोजिण्यात आलेला ‘आर‘ती’चा तास उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल दीड लाख जणांनी या उपक्रमाला पाठिंबा देत सहभागाची नोंदणी केली आहे.

 R'ati 'hour, history to build; More than half a million people register their registration | आर‘ती’चा तास, घडविणार इतिहास; तब्बल दीड लाख जणांनी केली नोंदणी

आर‘ती’चा तास, घडविणार इतिहास; तब्बल दीड लाख जणांनी केली नोंदणी

googlenewsNext

पुणे : महिलाशक्तीचा सन्मान करण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने आयोजिण्यात आलेला ‘आर‘ती’चा तास उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल दीड लाख जणांनी या उपक्रमाला पाठिंबा देत सहभागाची नोंदणी केली आहे. यामध्ये नागरिकांबरोबर सार्वजनिक गणेश मंडळ, संस्थांचा समावेश आहे. आज (रविवारी) सायंकाळी सात ते आठ या वेळेत केवळ महिला आरती करून नवा इतिहास घडविणार आहेत.
गणेशोत्सवात महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी ‘लोकमत’च्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून ‘ती’चा गणपती हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी (दि. २७) सायंकाळी सात ते आठ या वेळेत महिलांच्या हस्ते आरती होणार आहे. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि पुण्यातील मान्यवर महिलांच्या उपस्थितीत या उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती. ‘मिस्ड कॉल’ देऊन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यामध्ये तब्बल १ लाख ५२ हजार
३३४ जणांनी नोंदणी केली आहे. रोझरी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट प्रस्तुत, सिस्काच्या सहयोगाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ट्रॅव्हल पार्टनर पीएफटी हॉलिडेज, हेल्थ पार्टनर पॅन आॅर्थो, आऊटडोअर पार्टनर धीरेंद्र अ‍ॅडव्हर्टायझिंग
आहेत.

आपणही द्या महिलांना सन्मान
आर‘ती’चा तास या उपक्रमात सहभागी होत आपणही महिलांना सन्मान द्या. आपल्या घरी, संस्थेत, सार्वजनिक गणेश मंडळांत महिलांच्या हस्ते केलेल्या आरतीचा फोटो  lokmattichaganpati@gmail.com या ई-मेल आयडीवर नाव, पत्ता आणि मोबाईल नंबरसह पाठवा. आपले फोटो लोकमत फेसबुक पेजवर अपलोड केले जातील. आपले फोटो पाहण्यासाठी निवडक फोटोंना प्रसिद्धीही दिली जाईल. आपले फोटो www.facebook.com/lokmatpune या पेजला लाईक करा.

‘लोकमत’तर्फे गेल्या ५ वर्षांपासून ‘ती’चा गणपती ही अभिनव चळवळ उभी केली आहे. स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीला बळकटी देत असताना समानतेच्या धोरणाची पाळेमुळे समाजात खोलवर रुजण्याची गरज आहे. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून यंदा ‘लोकमत’च्या ‘तीचा गणपती’ या उपक्रमांतर्गत आर‘ती’चा तास ही संकल्पना साकारून पुरोगामित्वाच्या दिशेने पाऊल टाकले जात आहे.

‘लोकमत’तर्फे गेल्या ५ वर्षांपासून ‘ती’चा गणपती ही अभिनव चळवळ उभी केली आहे. स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीला बळकटी देत असताना समानतेच्या धोरणाची पाळेमुळे समाजात खोलवर रुजण्याची गरज आहे. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून यंदा ‘लोकमत’च्या ‘तीचा गणपती’ या उपक्रमांतर्गत आर‘ती’चा तास ही संकल्पना साकारून पुरोगामित्वाच्या दिशेने पाऊल टाकले जात आहे.

आर‘ती’चा तास या उपक्रमांतर्गत गणेशोत्सवाच्या तिसºया दिवशी महाराष्ट्रात सर्वत्र गणपतीची आरती महिलेच्या हस्ते केली जावी, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आली आहे. स्त्री सबलीकरणाच्या चळवळीतील पुढचे पाऊल म्हणून ही संकल्पना अधोरेखित होत असताना, सर्व स्तरांमधून यास भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

Web Title:  R'ati 'hour, history to build; More than half a million people register their registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.