रतीलाल बाबेल यांचा तीन पुरस्कारांनी सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:14 AM2021-09-08T04:14:53+5:302021-09-08T04:14:53+5:30
तंत्रस्नेही गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान पुण्यात प्रदान करण्यात आला. शाहीर देवा कांबळे लोककला मंच, पुणे यांच्या वतीने ‘तंत्रस्नेही गुणवंत ...
तंत्रस्नेही गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान पुण्यात प्रदान करण्यात आला. शाहीर देवा कांबळे लोककला मंच, पुणे यांच्या वतीने ‘तंत्रस्नेही गुणवंत शिक्षक पुरस्कार’ पुणे या ठिकाणी राजगड ज्ञानपीठाचे विशेष कार्यकारी अधिकारी तात्याराव जेटीथोर यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. याप्रसंगी डायट अधिव्याख्याता जोगदंडे आष्टी तालुका बीडचे शिक्षणाधिकारी सुधाकर जाधव, शाहीर हेमंतराजे मावळे, अध्यक्ष शाहीर हिंगे उपस्थित होते. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन बाबेल यांचा सत्कार करण्यात आला.
‘शिक्षक ध्येय’ यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या ‘राज्यस्तरीय उपक्रम’ स्पर्धेत प्रा. रतिलाल बाबेल यांनी शिक्षण क्षेत्रात मुक्तपणे काम करणाऱ्या व्यक्ती या गटात सहभाग नोंदवून सादर केलेल्या नवउपक्रमास राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्यामुळे त्यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२१ जाहीर झाल्याची माहिती शिक्षक ध्येयचे संपादक मधुकर धायदार यांनी दिली.
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ, नागपूर विभाग, यांच्या वतीने प्रा. रतिलाल बाबेल यांना ‘राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षकरत्न पुरस्कार २०२१’ जाहीर झाल्याची माहिती नागपूर शिक्षण मंडळाचे माजी सदस्य, शिक्षक नेते व संस्थापक अध्यक्ष मिलिंद वानखेडे यांनी दिली. २६ सप्टेंबर रोजी नागपूर या ठिकाणी भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
070921\20210907_161815.jpg
?????? - ???? ???? ????.?????? ????? ????? ??????????? ?????? ?????? ??????????? ???????? ??????? ???.