रेशनकार्ड धारक वैतागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:09 AM2021-04-04T04:09:55+5:302021-04-04T04:09:55+5:30
तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून वाटप करण्यात आलेला मका अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून तो मका गुरेही खात नसल्याचा आरोप ...
तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून वाटप करण्यात आलेला मका अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून तो मका गुरेही खात नसल्याचा आरोप कार्डधारकांना मधून होत आहे.
गरिबांना अल्प दरात अन्नधान्य मिळावे म्हणून रेशनकार्डच्या माध्यमातून अन्नधान्याचे वाटप केले जाते. यात अनेक बदल करण्यात आले असून सध्या मका मोठ्या प्रमाणावर तुटल्याने तो नागरिकांना रेशन दुकानांमधून विकला जात आहे.
सध्या अंत्योदय योजनेतून 35 किलो धान्य दिले जाते. त्यात 23 किलो गहू ,बारा किलो तांदूळ आणि नऊ किलो मका दिला जात आहे. प्राधान्य कुटुंबाला देण्यात येणार्या अन्नधान्य पुरवठा ही कपात केली असून आधी तीन किलो गहू दिला जात होता . आता त्यात कपात केली असल्याचे सांगण्यात आले. सध्या एक किलो गहू कपात करण्यात आला आहे.
कान्हूरमेसाई येथील रेशनिंग दुकानात आलेला निकृष्ट दर्जाचा मका.