रेशन दुकानदार फेडरेशन आक्रमक
By admin | Published: March 25, 2016 03:42 AM2016-03-25T03:42:37+5:302016-03-25T03:42:37+5:30
रास्त भाव धान्य दुकान व हॉकर्स, किरकोळ केरोसीन परवानाधारकांच्या विविध मागण्या व समस्यांकडे अन्नधान्य पुरवठामंत्री गिरीश बापट जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ
पिंपरी : रास्त भाव धान्य दुकान व हॉकर्स, किरकोळ केरोसीन परवानाधारकांच्या विविध मागण्या व समस्यांकडे अन्नधान्य पुरवठामंत्री गिरीश बापट जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ आॅल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स फेडरेशने आक्रमक पवित्रा घेतला आहे, असे माजी खासदार व संस्थेचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
केंद्रीय अन्न सुरक्षा कायद्यान्वये गहू, तांदूळ फक्त बीपीएल अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मिळणाऱ्या लेव्ही साखरेचा कोटासुद्धा द्वारपोच योजनेत समाविष्ट करावा. हमाली यांची अंमलबजावणी व्हावी. सर्वोच्च न्यायालयातील याचिकेप्रमाणे न्यायमूर्ती डी. पी. वाधवा समितीने दिलेल्या अहवालानुसार राज्यात अन्न धान्य महामंडळ स्थापन करावे. राज्यात अस्तित्वात असलेल्या सर्व रास्त भाव धान्य दुकान व हॉकर्स किरकोळ केरोसीन परवानाधारकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अंमलबजावणी करावी. तमिळनाडूत शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे सुविधा मिळतात, आदी मागण्यांसाठी ४ एप्रिलला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे.
(प्रतिनिधी)