रेशन दुकानदारच हिरावून घेतायत गरिबांच्या तोंडचा घास

By admin | Published: March 28, 2016 03:13 AM2016-03-28T03:13:45+5:302016-03-28T03:13:45+5:30

दारिद्र्यरेषेखाली लोकांना किमान दोन वेळचे अन्न मिळावे याकरिता दोन रुपये किलोने गहू, तांदूळ उपलब्ध करून देणाऱ्या महत्त्वाकांक्षी अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना धान्य देण्यास

The ration shopkeepers take advantage of the poor grasshopper | रेशन दुकानदारच हिरावून घेतायत गरिबांच्या तोंडचा घास

रेशन दुकानदारच हिरावून घेतायत गरिबांच्या तोंडचा घास

Next

पुणे : दारिद्र्यरेषेखाली लोकांना किमान दोन वेळचे अन्न मिळावे याकरिता दोन रुपये किलोने गहू, तांदूळ उपलब्ध करून देणाऱ्या महत्त्वाकांक्षी अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना धान्य देण्यास वेगवेगळी कारणे सांगून रेशन दुकानदारांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे उजेडात आले आहे. त्याचबरोबर अन्नसुरक्षा योजनेच्या यादीत अनेक दुबार व बोगस नावे टाकून मोठ्या प्रमाणात धान्य लाटले जात असल्याचे दिसून आले आहे.
केंद्रामध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर असताना त्यांनी २ फेब्रुवारी २०१४ पासून अन्नसुरक्षा योजना कार्यान्वित केली. याअंतर्गत शहरातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५९ हजारपर्यंत आहे, त्यांचा
या योजनेत लाभार्थी म्हणून समावेश करण्यात आला आहे. पुणे व
पिंपरी-चिंचवड शहरातील दारिद्र्यरेषेखालील ४ लाख कुटुंबांचा यामध्ये समावेश झाला आहे.
राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. महागाईमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना मोलमजुरी करणाऱ्या, अत्यंत हलाखीचे आयुष्य जगणाऱ्या, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना अन्नसुरक्षा योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला होता.
मात्र, प्रत्यक्षात या योजनेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. अन्नसुरक्षा योजनेचे धान्य घ्यायला रेशन दुकानांमध्ये गेल्यास आता फक्त तुमच्याकडे गॅस आहे, मग धान्य मिळणार नाही...मालच आला नाही...आता फक्त गहूच आलाय... तांदूळ संपलाय... माल कमी आलाय... पुढच्या महिन्यात या अशी वेगवेगळी कारणे सांगून धान्य देण्यास रेशन दुकानदारांकडून नकार दिला जातो. प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ देणे आवश्यक असताना प्रत्यक्षात निम्मेच धान्य दुकानदारांकडून दिले जाते, असे या योजनेतील लाभार्थी फईमा पठाण यांनी सांगितले.
अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांची यादी लोकहित फाउंडेशनचे अजहर खान यांनी माहिती अधिकारांतर्गत मिळविली. त्यामध्ये अनेक दुबार व बोगस लाभार्थींची नावे समाविष्ट असल्याचे दिसून आले. त्यातील काही नावे सोसायटीमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचीही होती.
दुबार व बोगस लाभार्थ्यांच्या नावावरील धान्य रेशन दुकारांदाराकडून परस्पर लाटले जाते. त्यांनी किमान गरजू लाभार्थींना तरी नियमाप्रमाणे योग्य धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अजहर खान यांनी केली आहे.
या योजनेअंतर्गत २ रुपये किलोने मिळणारे गहू, तांदूळ नंतर काळ्या बाजारामध्ये त्याची १५ रुपये किलोने विक्री केली जाते, असा आरोप खान यांनी केला आहे. (प्रतिनिधी)

गरजूंपर्यंत धान्य पोहोचविण्यात अपयश

शहरामध्ये फुटपाथवर, नदीच्या
काठावर राहणारे तसेच हलाखीचे जीवन जगत असलेली अनेक कुटुंबे आहेत. अन्नसुरक्षा योजनेतील धान्याची
खरी गरज या कुटुंबीयांना आहे. मात्र त्यांच्याकडे रेशनकार्ड नसल्याने त्यांच्यापर्यंत ही योजनाच पोहोचू शकलेली नाही. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने भटक्या कुटुंबांना तात्पुरते रेशनकार्ड देऊन धान्य देण्याचा प्रयत्न झाला; मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्यामध्ये फार यश आलेले नाही.

अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या यादीत एका नगरसेवकाच्या आईचे, रेशनदुकानदाराचे नाव असल्याचे माहिती अधिकारांतर्गत उजेडात आले आहे. वार्षिक उत्पन्न ५९ हजारपेक्षा कमी असण्याची अट असतानाही अशा पद्धतीने अनेक बड्या लोकांची नावे यात समाविष्ट आहेत.

Web Title: The ration shopkeepers take advantage of the poor grasshopper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.