शिधापत्रिकांची भिस्त दादा, भाऊ, अण्णांवर

By admin | Published: November 23, 2014 12:19 AM2014-11-23T00:19:39+5:302014-11-23T00:19:39+5:30

शिधापत्रिका काढायचीय, नाव बदलायचय, पत्ता बदलायचाय, असे शासकीय पातळीवरील शिधापत्रिकेसंदर्भातील कोणतेही काम सहजासहजी होणो अवघडच आहे.

The rationale of the ration cardboard is on Dada, Bhau, Anna | शिधापत्रिकांची भिस्त दादा, भाऊ, अण्णांवर

शिधापत्रिकांची भिस्त दादा, भाऊ, अण्णांवर

Next
पिंपरी : शिधापत्रिका काढायचीय, नाव बदलायचय, पत्ता बदलायचाय, असे शासकीय पातळीवरील शिधापत्रिकेसंदर्भातील कोणतेही काम सहजासहजी होणो अवघडच आहे. मात्र, महिनो-महिने न होणारे हे काम काही कालावधीत करून देण्याची हमी एजंटांकडून दिली जाते, हे चित्र आहे, निगडीतील जिल्हा अन्न धान्य पुरवठा परिमंडळ  कार्यालयाचे. पुरूष आणि महिला अशा तथाकथीत समाजसेवकांचा बुरखा परिधान केलेल्यांचा सुळसुळाट येथे दिसून येतो. हे कार्यालय एजंटांनी घेरले आहे. या कार्यालयाची भिस्त आवारात वावरणा:या अण्णा, दादा, भाऊ, तात्या, अण्णा, आबांवर भिस्त आहे. एजंट आणि कार्यालयीन कर्मचा:यांनी मिलिभगत असल्याने काम दक्षिणा दिल्या घेतल्याशिवाय होत नाही. 
निगडी प्रधिकरणातील संत तुकाराम महाराज व्यापारी संकुलातील पहिल्या मजल्यावर अन्नधान्य पुरवठा परिमंडळाचे (शिधापत्रिका) कार्यालय आहे. तसे पाहिले तर कार्यालयाची जागा अपूरी आहे. या ठिकाणी नवीन शिधापत्रिका काढणो, पत्यात बदल करणो, कुटुंबप्रमुखामधील बदल, दुकानासंबंधिचा बदल, नाव वगळणो, नाव बरोबर करणो आदी कामे कली जातात. स्वस्त धान्य दुकानांना दिला जाणारा कोटाही मंजूर केला जतो. 
कार्यालयाच्या आवारात शिधापत्रिकांची वेगवेगळी काम करून देणारी मंडळी वावरत असतात.  ‘काय करायचंय’, असे आस्थेवाईकपणो विचारतात. आणि मग संवाद सुरू होतो, आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. अर्ज भरण्यापासून तर अर्ज सादर करेर्पयतची माहिती देतात. कार्यालयात अर्ज दिला तर किती वेळ आणि आमच्याकडून केले तर किती वेळ याचीही माहिती देतात.
कार्यालयाच्या दारातच शिधापत्रिकेच्या अर्ज वाटप करणारा कर्मचारी टेबल टाकून बसलेला आहे. कार्यालयप्रवेशाच्या ठिकाणीच तो बसल्याने आतमध्ये जाणारांचा रस्ता बंद झाला आहे. मात्र, नियमितपणो येणा:या ‘चेह:यांनाच’ तो टेबल बाजूला सरकवून आत सोडतो.  
कर्मचारी नसणारे बाहेरील काहीजण तर समोरच असणा:या कार्यालय प्रमुखांच्या कक्षातच फायली चाळत शोधाशोध करताना दिसून येतात. गर्दीतून वाट काढत एक जण पुढे आला त्याने आतमध्ये समोरच असणा:यास आवाज दिला. तर साहेबांच्या केबीनमधून पांढ:या रंगाचा शर्ट परिधान केलेला एक जण बाहेर आला. ‘अमुक एक व्यक्तीने पाठविले आहे. नाव रद्द केल्याचे पत्र पाहिजे, असे सांगून त्याने कागदपत्रे आणि घडी मारलेले शंभर रूपये संबंधित व्यक्तीच्या हातात टेकविले. तुम्ही बाजूला थांबा असे म्हणत, तो व्यक्ती थेट केबीनमध्ये गेला आणि पाचच मिनिटात शिक्का मारून प्रमाणपत्र घेऊन आला आणि ते प्रमाणपत्र त्याने  संबंधित माणसाच्या हातात टेकविले. (प्रतिनिधी)
 
कार्यालयातील 
सूचना नावालाच 
4प्रवेशद्वारावरच अन्य शासकीय कार्यालयांप्रमाणो माहिती फलक लावलेले आहेत. कोणते काम किती दिवसात, कसे होईल याची माहिती दिली आहे. तसेच कार्यालयात फक्त ज्याचे काम आहे. त्याचेच अर्ज स्विकारले जातील, अन्य कोणाकडूनही अर्ज घेणार नाही, असे फलकावर नमूद केले आहे. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळेच आहे. अर्ज कार्यालयार्पयत पाहोचण्यापूर्वीच अजर्दारांना एजंट गाठत असतात.
 
असे होते 
शिधापत्रिकेचे काम
4परिमंडळातील वेगवेगळ्या विभागात शिधापत्रिकांचे काम करणारे एजंट आहेत, त्यांचे कनेक्शन कार्यालयातील कर्मचा:यांशी आहे. अर्ज घेऊन तिथे येणारा व्यक्ती आपले नाव आणि कोणी 
पाठविले आहे, हे संबंधित व्यक्तीस सांगतो, ओळख पटल्यानंतर तो कर्मचारी अर्ज घेऊन हे काम कधी होणार याबाबत ‘त्याना’ कळवितो,  असे सांगून कार्यालयाबाहेरच निधी स्विकारून कार्यालयात जातो.

 

Web Title: The rationale of the ration cardboard is on Dada, Bhau, Anna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.