रत्नागिरी हापूसची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 07:43 PM2018-04-02T19:43:58+5:302018-04-02T19:43:58+5:30
मार्केट यार्डात रत्नागिरी, देवगड आणि रायगड जिल्ह्यातून हापूस आंब्याच्या सुमारे १० हजार पेट्यांची आवक झाली.
पुणे: ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या रत्नागिरी हापूसची आवक दिवसेंदिवस वाढत चालेली असून रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात तब्बल दहा हजार पेट्यांची आवक झाली. बाजारात चांगल्या प्रतीचा आंबा दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. त्यातच आता कर्नाटक हापूसची आवकही काही प्रमाणात वाढ आहे. परिणामी रत्नागिरी हापूसच्या दरात घट होत आहे.त्यामुळे पुढील दोन आठवड्यात आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल,असा अंदाज मार्केट यार्डातील फळव्यापा-यांकडून वर्तविला जात आहे.
रत्नागिरी हापूस आंब्याचे व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, रविवारी मार्केट यार्डात रत्नागिरी, देवगड आणि रायगड जिल्ह्यातून हापूस आंब्याच्या सुमारे १० हजार पेट्यांची आवक झाली.मार्केट यार्डात रत्नागिरी, देवगड आणि रायगड जिल्ह्यातून हापूस आंब्याच्या सुमारे १० हजार पेट्यांची आवक झाली. घाऊक बाजारात कच्चा हापूस आंब्याच्या ४ ते ८ डझनाच्या एका पेटीस १५०० ते ३५०० रुपये भाव मिळाला. तर, तयार आंब्याच्या ४ ते ८ डझनच्या पेटीस २००० ते ४००० रुपये दर मिळाला. सुरूवातीला रत्नागिरी हापूस आंब्याची केवळ १०० ते २०० पेट्यांची आवक होत होती. आता आवक वाढली असून सध्या बाजारात चांगल्या दर्जाचे आंबे दाखल होत आहेत. आता आवक वाढली असून सध्या बाजारात चांगल्या दर्जाचे आंबे दाखल होत आहेत.
दरम्यान,लालबाग, बदाम, पायरीची ५ टन इतकी आवक झाली. लालबागला (कच्चा) प्रतिकिलोस ५० ते ७० रुपये, बदामला ६० ते ८० रुपये, पायरीला ८० ते १०० रुपये किलो असा दर मिळाला,असे आंब्याच्या व्यापा-यांनी सांगितले.
-----------------------
कर्नाटक हापूसची आवक वाढली
कर्नाटकातील हापूस आंब्यावर हवामान बदलाचा परिणाम झाला आहे.त्यामुळे कर्नाटक हापूसची आवक कमी होत होती.मात्र,रविवारी बाजारात कर्नाटक हापूस आंब्याच्या सुमारे साडेतीन हजार पेट्या इतकी आवक झाली. कर्नाटक हापूसच्या (कच्चा) ३ ते ५ डझनाच्या एका पेटीस १००० ते १६०० तर तयार कर्नाटक हापूसच्या एका पेटीस १५०० ते २००० रुपये भाव मिळाला,असे कर्नाटक हापूस आंब्याचे व्यापारी रोहन उरसळ यांंनी सांगितले.