रत्नागिरी हापूसचे भाव तेजीतच

By admin | Published: April 24, 2017 04:34 AM2017-04-24T04:34:54+5:302017-04-24T04:34:54+5:30

रत्नागिरी हापूस आंब्याची आवक कमी होत असल्याने अद्याप भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेले नाहीत. त्या तुलनेत

Ratnagiri Hapus's price was steadily rising | रत्नागिरी हापूसचे भाव तेजीतच

रत्नागिरी हापूसचे भाव तेजीतच

Next

पुणे : रत्नागिरी हापूस आंब्याची आवक कमी होत असल्याने अद्याप भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेले नाहीत. त्या तुलनेत कर्नाटक हापूसची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने भाव आटोक्यात असून मागणीही वाढली आहे.
गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी रत्नागिरी हापूस आंब्याची ३ ते ५ हजार पेटी तर कर्नाटक हापूसची २० ते २५ हजार पेटी इतकी आवक झाली. आवक जास्त होत असल्याने रत्नागिरीच्या हापूसच्या तुलनेत कर्नाटक हापूसचे भाव आवाक्यात आले आहेत. त्यामुळे कर्नाटक हापूसलाही मागणी वाढली आहे. कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ म्हणाले, ‘‘चांगल्या प्रतीच्या कर्नाटक हापूसची आवक वाढली आहे. तसेच अक्षय तृतीयेला परवडणाऱ्या भावात तयार हापूस आंबा बाजारात उपलब्ध होणार आहे. सध्या आवक जास्त असल्यानेही भाव आवाक्यात आहेत.’’
रत्नागिरी हापूसचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घाऊक बाजारात ४ ते ७ डझनाची संपूर्ण पेटी घेतल्यास सर्वसामान्य ग्राहकांना परवडत आहे. रत्नागिरी हापूस दर्जा आणि आकारानुसार प्रतिडझन २५० ते ३०० आणि ३०० ते ५०० रुपयापर्यंत भाव मिळत आहे.

Web Title: Ratnagiri Hapus's price was steadily rising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.