गाेहत्या वक्तव्याप्रकरणी रावसाहेब दानवे यांची पक्षातून हकालपट्टी करावी : मिलिंद एकबाेटे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 01:59 PM2019-11-06T13:59:25+5:302019-11-06T14:00:52+5:30
रावसाहेब दानवे यांच्या गाेहत्येबाबतच्या वक्तव्याचा मिलिंद एकबाेटे यांनी निषेध केला असून त्यांच्या वक्तव्याच्या विराेधात उद्या आंदाेलन करण्यात येणार आहे.
पुणे : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गाेहत्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत दानवे यांची पक्षातून हकालपट्टीची मागणी अखिल भारत कृषि गाेसेवा संघाचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष मिलिंद एकबाेटे यांनी केली आहे. पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. दानवेंच्या वक्तव्याच्या विराेधात उद्या झाशीच्या राणी चाैकात आंदाेलन करणार असल्याचे देखील एकबाेटे यांनी यावेळी सांगितले.
काही दिवसांपूर्वी दानवे यांनी जालना लाेकसभा मतदार संघात झालेल्या एका बैठकीत गाेहत्येचे समर्थन केले हाेते. त्यांच्या वक्तव्याची क्लिप व्हायरल झाली हाेती. त्यावर अनेक स्तरातून टीका केली जात हाेती. गाेवंश हत्या बंदीचा कायदा भाजप सरकारने केला हाेता. परंतु त्यांच्याच एका केंद्रीय राज्यमंत्र्याने गाेहत्येचे समर्थन केल्याने दानवेंच्या विराेधात राेष व्यक्त केला जात हाेता.
एकबाेटे म्हणाले, केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांनी कसायांच्या एका बैठकीमध्ये जेवढे कापायचे तेवढे जनावरे कापा असे वक्तव्य केले हाेते. त्यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीने गाेहत्येचे समर्थन करणारे वक्तव्य करणे अपेक्षित नव्हते. त्यांच्या वक्तव्याबाबत राज्यात नाराजी आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही उद्या आंदाेलन करणार आहाेत. कुठल्याही प्रवृत्तीच्या विराेधात लढले पाहिजे. दानवे जर मुस्लिमांच्या तुष्टीकरणासाठी गाेहहिताला तिलांजली देत असतील तर एक गाेमातेचा भक्त म्हणून आम्ही दानवेंच्या वक्तव्याचा निषेध करत आहाेत. दानवेंनी त्यांचे वक्तव्य मागे घ्यायला हवे. त्यांनी माफी मागायला हवी अन्यथा पक्षाने त्यांना पक्षातून काढून टाकायला हवे.