रविराज तावरे गोळीबार प्रकरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:13 AM2021-07-07T04:13:28+5:302021-07-07T04:13:28+5:30
रविराज तावरे गोळीबार प्रकरणी माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे अटक बारामती :माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ...
रविराज तावरे गोळीबार प्रकरणी
माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे अटक
बारामती :माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज सदाशिवराव तावरे (वय ४०) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी बारामती ग्रामीण पोलिसांनी सोमवारी (दि. ५) रात्री माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यास अटक केली आहे.
३१ मे रोजी सायंकाळी रविराज तावरे हे त्यांची पत्नी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी रविराज तावरे यांच्या समवेत सायंकाळी पावणे सातच्या सुमारास येथील संभाजीनगरला वडापाव घेण्यासाठी आले होते. या वेळी वडापाव घेऊन त्यांनी संबंधित दुकानदाराचे पैसे दिले. त्यानंतर गाडीकडे येत असताना त्यांच्यावर प्रशांत मोरे टोळीने गोळीबार केला.
रविराज तावरे हे त्यांची पत्नी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी रविराज तावरे यांच्या फिर्यादीवरून यापूर्वी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह राहुल उर्फ रिबेल यादव, प्रशांत मोरे, विनोद उर्फ टॉम मोरे यांच्याविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमातन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी सध्या कारागृहात आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार: रविराज तावरे यांचा जबाब घेण्यात आला होता. त्यांनी त्यांच्या जबाबात माजी सरपंच माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यास अटक केली आहे. पोलीस तपासात देखील जयदीप तावरे याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सोमवारी (दि. ५) रात्री माळेगाव बुद्रुक येथून अटक करण्यात आली आहे. आरोपी तावरे यास पुणे येथील मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी त्यास १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण,पोलीस हवालदार सुरेश भोई,पोलीस नाईक सुरेश दडस,परिमल मानेर, विजय वाघमोडे,नंदु जाधव,विनोद लोखंडे,राहुल पांढरे यांनी कारवाई केली.