रविराज तावरे यांना उपचारासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:39+5:302021-06-03T04:08:39+5:30
प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे स्पष्टीकरण बारामती : जिल्हा परिषद सदस्या रोहिणी रविराज तावरे यांचे पती राष्ट्रवादी ...
प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे स्पष्टीकरण
बारामती : जिल्हा परिषद सदस्या रोहिणी रविराज तावरे यांचे पती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज तावरे यांना बुधवारी (दि.२) पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे. तावरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती देखील स्थीर आहे. केवळ पुढील उपचारासाठी तावरे यांना पुण्याला हलविण्यात आल्याचे त्यांच्यावर उपचार करणा-या डॉ. रमेश भोईटे यांनी सांगितले.
तावरे (वय ४०) यांच्यावर सोमवारी (दि.३१) भर सायंकाळी गोळीबार केला. या घटनेनंतर तावरे यांना बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर तावरे यांच्यावर येथील गिरिराज रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. गिरिराज रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रमेश भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याचे हृदय शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. रमेश चव्हाण, अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ. नीती महाडिक, भूलतज्ज्ञ डॉ. संतोष घालमे, डॉ. अमर पवार, डॉ. संजय पुरंधरे, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सनी शिंदे, डॉ. सुनील पवार, डॉ. भास्कर जेधे, डॉ. अजिंक्य निंबाळकर आदी डॉक्टरांच्या पथकाने मंगळवारी (दि.१) मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास शस्त्रक्रिया करीत तावरे यांच्या शरीरात घुसलेली गोेळी बाहेर काढली. ीही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. या शस्त्रक्रियेनंतर तावरे यांच्यावर गिरिराजच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
याबाबत डॉ. भोईटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, तावरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. नातेवाईकांच्या इच्छेनुसार पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यात हलविण्यात आले आहे.
...तीन आरोपींना ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान रविराज तावरे गोळीबारप्रकरणी बारामती ग्रामीण पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह राहुल ऊर्फ रिबेल यादव, प्रशांत मोरे, विनोद ऊर्फ टॉम मोरे यांना केली अटक केली आहे. त्यापैकी तीन आरोपींना ७ जूनपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे तर अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती तपास अधिकारी बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली.