रायरेश्वर किल्ल्यावर पर्यटनाच्यादृष्टीने होणार विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:10 AM2021-04-10T04:10:28+5:302021-04-10T04:10:28+5:30
भोर: तालुक्यातील रायरेश्वर आणि राेहिडेश्वर किल्ल्याच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडून दोन कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर झाला ...
भोर: तालुक्यातील रायरेश्वर आणि राेहिडेश्वर किल्ल्याच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडून दोन कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर झाला होता. भूमिपूजन करुनही तीन वर्षात एकही काम झाले नव्हते. मात्र, आता पर्यटन विभागाकडून आता रायरेश्वर किल्ल्याच्या विकासाचे काम बांधकाम विभागाला देण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी बैठकिस एमआडीसीचे हरणे,पुरातत्व विभागाचे वाहणे, जिल्हा नियोजनचे मरकळ,सा.बां.चे संजय वागजे तसेच भोर च्या उपविभागीय वनाधिकारी आशा भोंग उपस्थित होते.
आमदार संग्राम थाेपटे यांनी तालुक्यातील रायरेश्वर आणि रोहिडेश्वर किल्याच्या विकासासाठी प्रयत्न केले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ तर्फे २ कोटी ९६ लाख ४५ हजार रुपयांचा निधी मंजू झाला होता. या कामांचे भूमिपूजनही तत्कालीन मंत्री जयकुमार रावळ यांचे हस्ते मोठा गाजावाजा करुन खासदारचे उपस्थित झाले होते. मात्र मार्च २०१७ साली मंजुर झालेल्या या निधितुन तीन वर्षात एकही काम झाले नसल्याने या निधीचे व कामांचे काय झाले असा प्रश्न जिल्हा नियोजन समितीचे बैठकित उपस्थित करुन हा निधी एमआरडीसीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे वर्ग करण्याची मागणी आमदार थोपटे यांनी केली होती. त्यानुसार हे काम वर्ग करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत पावसाळ्यापुर्वी रायरेश्वर वाई फाटा ते रायरेश्वर किल्ला या ८०० मीटर लांबीच्या व ५ फुट रुंदीच्या रस्त्याचे सिमेंट काॅक्रिटीकरण, किल्ल्याच्या पायथ्याला पर्यटकांची वाहने पार्किंग करण्यासाठीचे जागेचे काँक्रिटीकरण, गडावरील पडझड झालेल्या मंदीर परिसर संरक्षण भिंतीची दुरुस्तीचे काम अशी महत्वाची कामे करण्यासाठी टेंडर प्रक्रीया पुर्ण केली जाणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगीतले.
आमदार थोपटेंनी केली पाहणी
रायरेश्वर किल्ल्यावर जाणाऱ्या शिडीची दुरुस्ती,पर्यटकांसाठी निवारा केंद्र,पथदिवे, स्वच्छतागृह, गडावरील शिवमंदीराचा जिर्णोद्धार, मंदिर परिसर सुशोभिकरण या सारखी कामे होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आमदार संग्राम थोपटे यांनी गुरुवारी प्रत्यक्ष किल्ल्यावर भेट देवून तेथील स्थानिकांच्या समस्या समजावून घेतल्या . त्याचबरोबर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवश्वासही त्यांनी दिले. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभाग भोरचे उप विभागीय अभियंता संजय वागज, स्थानिक किशोर जंगम, सखाराम जंगम, विनोद जंगम, संपत जंगम, दगडू जंगम, तानाजी जंगम, सोमनाथ जंगम, पांडुरंग जंगम, दशरथ जंगम आदींसह रायरेश्वरावरील जंगम बांधव उपस्थित होते.
०९ भाेर
रायरेश्वर किल्ला परिसराची पाहणी करताना आमदार संग्राम थोपटे व इतर.