ऑनलाईन शिक्षणांमध्ये रयत शिक्षण संस्थेने क्रांती घडविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:11 AM2021-09-23T04:11:36+5:302021-09-23T04:11:36+5:30
शिरूर : महाराष्ट्रात कोविडच्या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षणामध्ये रयत शिक्षण संस्थेने क्रांती घडविली असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे ...
शिरूर : महाराष्ट्रात कोविडच्या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षणामध्ये रयत शिक्षण संस्थेने क्रांती घडविली असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे सदस्य जाकीर खान पठाण यांनी केले.
शिरूर येथील न्यू इंग्लिश स्कूल या रयत शिक्षण संस्थेच्या वतीने शहरामध्ये डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३४ वी जयंती सोहळ्यानिमित्त शिरूर नगरपालिकेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे सदस्य जाकीर खान पठाण, नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर, विद्यालयाचे प्राचार्य चौधरी, उपप्राचार्य डोंगरे, पर्यवेक्षक सणस, स्थानिक शाळा समितीचे सदस्य नीलेश खाबिया, डॉ . राहुल आवटे, रोहिले सर, गिरिगोसावी सर, माने भोसले सर आदी हजर होते.
या वेळी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, लक्ष्मीबाई पाटील, संस्थेचे माजी सदस्य स्व. शाहिदखान पठाण यांना उपस्थितांनी अभिवादन केले. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. विद्यार्थ्यांना नवनवीन विविध प्रकारचे तंत्रज्ञान शिकविणाऱ्या शिक्षकांचा जनरल बॉडी सदस्य जाकीर खान पठाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.