महाराष्ट्र बॅँकेवर आरबीआयचे निर्बंध
By admin | Published: June 19, 2017 05:23 AM2017-06-19T05:23:09+5:302017-06-19T05:23:09+5:30
बँक आॅफ महाराष्ट्रची अनुत्पादकता वाढली असून बुडीत कर्जांचे प्रमाण तब्बल 11.76 टक्क्यांवर पोचले आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्र बँकेवर प्रॉम्प्ट करेक्टिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बँक आॅफ महाराष्ट्रची अनुत्पादकता वाढली असून बुडीत कर्जांचे प्रमाण तब्बल 11.76 टक्क्यांवर पोचले आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्र बँकेवर प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन (पीसीए) नुसार कारवाई करीत निर्बंध लादले आहेत. पीसीएच्या निर्बंधानुसार आरबीआयच्या परवानगीशिवाय नव्या शाखा सुरु करता येत नाहीत. विशेष म्हणजे बँकेच्या उपकंपन्यांमध्येही या कारवाईमुळे गुंतवणूक करता येत नाही. यातील नेमके कोणते निर्बंध लादण्यात आले आहेत याबाबत स्पष्टपन्णे माहिती मिळू शकली नाही.
पीसीएनुसार कारवाई झालेली महाराष्ट्र बँक ही पाचवी बँक ठरली असून आयडीबीआय, युको, देना, सेंट्रल बँकांवरही अशा प्रकारचे निर्बंध लादण्यात आलेले आहेत. अशी कारवाई झालेल्या बँकेच्या कामकाजावर आरबीआयचे काही प्रमाणात नियंत्रण राहते. यासोबतच मोठ्या रकमांची कर्जे देण्यावर बंधने येतात. पीसीएनुसार कारवाईसाठी असलेल्या निकषांपैकी महाराष्ट्र बँकेच्या अनुत्पादित कर्ज अधिक असल्याने कारवाई झाली आहे. बँकेच्या आर्थिक परिस्थिती, मालमत्तेचा दर्जा सुधारण्यासोबतच व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सदर निर्बंध लावण्यात आलेल्याचे महाराष्ट्र बँकेने कळविले आहे.
२०१६-१७ या वर्षा दरम्यान बँकेने भांडवल पर्याप्तता निधिचे प्रमाण 11.18 टक्के राखले होते. तर कासा (बचत खाते आणि चालू खाते) यांच्या प्रमाणामध्ये 36.6 टक्यांवरून 44.89 टक्यांची वाढ झाली आहे. व्याजेतर उत्पन्नामध्येही 47 टक्क्यांची वाढ झाली असून बुडीत कर्जाचीही वसुली चांगली झाल्याचे मराठे यांनी सांगितले आहे.