पुण्यातील सुवर्णयुग सहकारी बँकेला RBI चा दणका; तब्बल १ लाखाचा ठोठावला दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 09:35 AM2023-05-04T09:35:31+5:302023-05-04T09:35:41+5:30
रिझर्व्ह बॅँकेच्या सर्वेक्षणात काही दोष आढळल्यास त्या बॅँकेवर कारवाई केली जाते
पुणे : भारतीय केंद्रीय बँकेने (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) सहकार क्षेत्रातील शहरातील सुवर्णयुग सहकारी बँकेला अनियमितता, आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ लाखाचा दंड ठोठावला आहे.
देशभरातील बँकांचा रिझर्व्ह बँक आढावा घेत असते. नियमांचे पालन केले जात आहे की नाही, टाळेबंदचा तपशील व्यवस्थित आहे की नाही, याची तपासणी केली जाते. सर्व सहकारी बॅँकांना आरबीआयच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. रिझर्व्ह बॅँकेच्या सर्वेक्षणात काही दोष आढळल्यास त्या बॅँकेवर कारवाई केली जाते. काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बॅँकेने देशभरातील बॅँकांचे सर्वेक्षण केले होते. त्यात काही बॅँकांच्या कार्यप्रणालीत दोष आढळला, अशा बॅँकांवर रिझर्व्ह बॅँकेने कारवाईचा बडगा उगारला. त्यात काही दिवसांपूर्वी शहरातील जनता सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेने १३ लाखांचा दंड ठोठावला होता, आता सुवर्णयुग सहकारी बँकेला १ लाखाचा दंड ठोठावल्याचे आरबीआयने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.