शिवसेनेचे ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:07 AM2021-07-24T04:07:55+5:302021-07-24T04:07:55+5:30
यावेळी जिल्हाप्रमुख माऊली कटके, सहसंपर्कप्रमुक अशोक खांडेभराड, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, प्रकाश वाडेकर, स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे ...
यावेळी जिल्हाप्रमुख माऊली कटके, सहसंपर्कप्रमुक अशोक खांडेभराड, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, प्रकाश वाडेकर, स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान अध्यक्ष नितीन गोरे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, साहेबराव कड, नंदा कड, माजी नगरसेवक धिरज मुटके, निलेश गोरे, प्रकाश गोरे, शहरप्रमुख महेश शेवकरी, विजय शिंदे, स्वप्निल बिरदवडे, ज्योती अरगडे, कविता करपे आदी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेप्रमाणे युती आघाडीची चिंता न करता शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी शिवसेना पक्ष शिवसंपर्क अभियान सुरू आहे. येणाऱ्या चाकण पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढळराव यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना देऊन पक्ष बांधणीसाठी जोर देण्याचे आवाहन केले. पक्षाच्या जोरावर पदे घेऊन मिरवायचे, परंतु बैठकांना गैरहजर राहायचे असे अजिबात खपवून घेणार नसल्याचे तालुकाप्रमुख रामदास धनवटे यांनी सुनावले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश शेवकरी यांनी केले.