परिश्रमाच्या जोरावर यशाची शिखरे गाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:08 AM2021-01-10T04:08:49+5:302021-01-10T04:08:49+5:30

लोणी काळभोर : ‘‘युवकांनी सतत प्रयत्न व कठोर परिश्रम करून यशाची शिखरे पादाक्रांत करावीत. त्याचबरोबर समाजातील गरजू घटकांना आवर्जून ...

Reach the pinnacle of success through hard work | परिश्रमाच्या जोरावर यशाची शिखरे गाठा

परिश्रमाच्या जोरावर यशाची शिखरे गाठा

Next

लोणी काळभोर : ‘‘युवकांनी सतत प्रयत्न व कठोर परिश्रम करून यशाची शिखरे पादाक्रांत करावीत. त्याचबरोबर समाजातील गरजू घटकांना आवर्जून मदत करावी. हाच जीवनातील यशाचा मूलमंत्र आहे,’’ असे प्रतिपादन आरोग्य क्षेत्रातील ज्येष्ठ समाजसेवक श्रीधर लोखंडे यांनी केले.

लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्रीधर लोखंडे बोलत होते. या वेळी कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींच्या सदस्या मंदा नामुगड़े, महिला बचत गटाच्या कौसल्या राऊत, स्नेहा हिंगमिरे, वर्षा ननवरे उपस्थित होते.

यावेळी मनोरंजनपर कार्यक्रमातून सावित्रीमाईचा इतिहास जिवंत करण्यात आला. याप्रसंगी नाटिका, एकपात्री प्रयोग, कविता सादर करण्यात आल्या. मुलींनी सावित्रीमाईंच्या बालपणापासूनचा जीवनप्रवास उलगडून दाखवला. सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याची ओळख उपस्थितांना करून दिली. तसेच महिला मुक्तीदिन विशेष नाटिका ही सादर करण्यात आली. अंकिता काळभोर हिने ‘सावित्री आपल्या भेटीला’ हा एकपात्री प्रयोग सादर केला, तनूजा राजगुरु व सुहानी ननवरेने "मी सावित्री बोलते" ही नाटिका सादर केली. नम्रता मुळे, पल्लवी जाधव, शिवानी शिंदे, श्रुतिका शेंबडे यांनी मुलाखतीचा कार्यक्रम सादर केला.

फोटो - लोणी काळभोर - सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करताना महिला भगिनी

Web Title: Reach the pinnacle of success through hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.