आत्महत्येचं टोक गाठण्यापूर्वी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:27 AM2020-12-12T04:27:52+5:302020-12-12T04:27:52+5:30

पुणे : “सध्या ‘लाइफस्टाइल मॅनेजमेंट’ची खूप चर्चा आहे. आपली प्रतिष्ठा, सुख यांच्या प्रदर्शनाच्या नादात शारीरिक आणि मानसिक ताण निर्माण ...

Before reaching the point of suicide ... | आत्महत्येचं टोक गाठण्यापूर्वी...

आत्महत्येचं टोक गाठण्यापूर्वी...

Next

पुणे : “सध्या ‘लाइफस्टाइल मॅनेजमेंट’ची खूप चर्चा आहे. आपली प्रतिष्ठा, सुख यांच्या प्रदर्शनाच्या नादात शारीरिक आणि मानसिक ताण निर्माण होतो आहे. ताणतणावातून उच्चपदस्थ व्यक्ती, सेलिब्रिटी आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलतात. सामान्य माणसांमध्येही आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्याचे धाडस वाढते आहे. ‘आयुष्य स्वस्त नाही, सुंदर आहे’ हे विविध माध्यमांमधून समाजमनावर बिंबवणे गरजेचे आहे,” असे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

अलीकडच्या काळात सुशांत सिंह राजपूत, भैय्यू महाराज, डॉ. शितल आमटे, अशा प्रसिद्ध व्यक्तींनी उचललेले आत्महत्येचे पाऊल धक्कादायक ठरले. यापैकी प्रत्येकाला मोठा अनुयायी वर्ग आहे. या अनुयायांवरही त्यांच्या आत्महत्येसारख्या कृत्यांचा परिणाम होतो का, असा प्रश्न यातून निर्माण होतो आहे.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अर्पिता जोशी म्हणाल्या की, आपल्या मनावर ताण आल्यास त्यातून बाहेर पडण्याची गरज असते. जवळच्या लोकांशी संवाद गरजेचा आहेच; मात्र, एखादी गोष्ट कोणाशीच शेअर करता न आल्यास घुसमट होते. अशा वेळी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेण्यात काहीच गैर नाही. मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याबाबतचा ‘टॅबू’ अजूनही कमी झालेला नाही. मात्र, लोकांना काय वाटते यापेक्षा आपली गरज काय आहे, हे जास्त महत्वाचे आहे. विविध थेरपी आणि औषधोपचारांच्या माध्यमातून नैराश्यावर नक्कीच मात करता येते.

चौकट

“गरजा वाढतात आणि पैसा कमी पडतो. प्रतिष्ठेचे मुखवटे समाजाला दाखवण्याच्या अट्टहासातून ताण निर्माण होतो. संतुलन साधता न आल्यास मानसिक अस्वस्थता येते, आत्मविश्वास कमी होतो. नैराश्याचे रुपांतर आत्महत्येच्या निर्णयात होते. वैयक्तिक गरजा, सामाजिक गरजा, अस्तित्वाची ओळख आणि नेतृत्व या चार पातळयांवर आपले मानसिक द्वंद्व सुरु होते. तुलना न करणे, स्वत:साठी जगण्याची गरज, मानसिक संतुलन गरजेचे आहे. पैसा हे माध्यम आहे, ध्येय नाही. आपल्या आयुष्यावर केवळ आपलाच हक्क आहे, हे स्वत:ला बजावता आले पाहिजे.”

- डॉ. पांडुरंग कदम, एमएस, सायकोथेरपिस्ट

Web Title: Before reaching the point of suicide ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.