लाँचसेवा सुरू झाल्याने ५0 कि.मीचा फेरा वाचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 03:42 AM2018-05-05T03:42:59+5:302018-05-05T03:42:59+5:30
पळसदेव व टाकळी या दोन जिल्ह्यांतील दोन टोकावरच्या गावामधून उजनीचे पात्र गेले आहे. केवळ २ ते ३ किलोमीटर अंतरासाठी येथील नागरिकांना दळणवळणासाठी ४० ते ५० किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागत होता. मात्र, येथील नागरिकांची हीच अडचण लक्षात घेऊन येथे लाँचसेवा चालू केली आहे.
न्हावी - पळसदेव व टाकळी या दोन जिल्ह्यांतील दोन टोकावरच्या गावामधून उजनीचे पात्र गेले आहे. केवळ २ ते ३ किलोमीटर अंतरासाठी येथील नागरिकांना दळणवळणासाठी ४० ते ५० किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागत होता. मात्र, येथील नागरिकांची हीच अडचण लक्षात घेऊन येथे लाँचसेवा चालू केली आहे. त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय दूर झाली. दुरावलेली मित्रमंडळी, नातेवाईक यांची नाती पुन्हा या यांत्रिक जलवाहतुकीमुळे सुरळीतपणे चालू झाली आहेत.
उजनी धरण होण्यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील टाकळी गावचे व पुणे जिल्ह्यातील पळसदेव गावचे अतिशय जुने नाते आहे. त्यामुळे टाकळी गावाला पळसदेव टाकळी या नावानेही ओळखले जात आहे. परंतु उजनी जलाशयाची निर्मिती झाली आणि धरणातील पाणीसाठा धरण्यास सुरुवात केल्यानंतर आज गेल्या ४० वर्षांपासून या दोन्ही गावांचा संपर्क तुटलेला आहे. त्यात काही टाकळीच्या मच्छीमार बांधवांनी दूध वाहतूक करण्याच्या हेतूने येथील नौकावाहतूक चालू केली आहे. येथील दळणवळणाचा संपर्क कायम राखण्यासाठीचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु तोही अयशस्वी ठरला. त्यानंतर पळसदेव येथील दीपक काळे या सुशिक्षित बेरोजगार तरुणाने येथील नागरिकांची गरज ओळखून पळसदेव टाकळी येथे यांत्रिक लाँचसेवा चालू के ली. त्यासाठी साधारण ८ ते १० लाख रुपये खर्च झाला आहे.