दीड वर्षापूर्वीच्या खुनाला फुटली वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:04 AM2021-05-04T04:04:39+5:302021-05-04T04:04:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रागाच्या भरात पत्नीचा खून केलेल्या पतीकडे करीत असलेल्या चौकशीतून पोलिसांना मिळालेल्या धाग्यावरून हडपसर पोलिसांना ...

Read about the murder that took place a year and a half ago | दीड वर्षापूर्वीच्या खुनाला फुटली वाचा

दीड वर्षापूर्वीच्या खुनाला फुटली वाचा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रागाच्या भरात पत्नीचा खून केलेल्या पतीकडे करीत असलेल्या चौकशीतून पोलिसांना मिळालेल्या धाग्यावरून हडपसर पोलिसांना फुरसुंगी येथील दीड वर्षापूर्वी झालेल्या खुनाची उकल करण्यात यश आले आहे.

हडपसर पोलिसांनी संतोष सहदेव शिंदे (वय २७, रा़ फुरसुंगी, मूळगाव चाकूर, जि. लातूर) याला अटक केली. संतोष शिंदे हा फुरसुंगी येथे अधूनमधून दारू पिण्यास जात असत. दशक्रियाविधी येथे नरसिंग विठ्ठल गव्हाणे (वय ६५, रा. जयभवानी चौक, फुरसुंगी) हाही तेथे गांजा व दारू पिण्यासाठी बसत होता. त्याला संतोष शिंदे येथे येणे आवडत नसे. तो त्याला तेथे बसून देत नव्हता. २९ डिसेंबर २०१९ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शिंदे हा तेथे दारू पिण्यास गेला असताना नरसिंग गव्हाणे हा अगोदरच आला होता. त्यांच्यात भांडणे झाली. त्यात शिंदे याने तेथील विटेने व दगडाने मारहाण करून गव्हाणे याचा खून केला होता. मात्र, हडपसर पोलिसांना दुसऱ्र्या दिवशी गव्हाणे याचा मृतदेह आढळून आला होता. परंतु, खून कोणी केला, याचा तपास होऊ शकला नव्हता.

सागर बाळू लोखंडे (वय २३) याने ७ मार्च रोजी आपली पत्नी शुभांगी लोखंडे (वय २१) ही घरी येत नसल्याच्या कारणावरून पत्नीला चाकूने भोसकून तिचा खून केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, सहायक निरीक्षक हनुमंत गायकवाड व इतर पोलीस अधिकारी सागर लोखंडे याचा पूर्वइतिहास जाणून घेत होते. शुभांगी याच्याबरोबर सागर याचे दुसरे लग्न होते. शुभांगी तिच्या पहिल्या नवर्‍याशी बोलत असल्याने त्याचा राग सागर याला येत होता. त्यावरुन दोघांमध्ये वाद होत होता. एकदा बोलता बोलता रागाच्या भरात शुभांगी हिने सागर याला माझ्या नवऱ्र्याने यापूर्वी एक मर्डर केला आहे. जर तू आमच्या दोघांमध्ये आलास तर तो तुला देखील संपवून टाकेल, अशी धमकी दिली होती. सागर याला शुभांगीच्या पहिल्या नवऱ्र्याचे संतोष इतकेच नाव माहिती होते. तो फुरसुंगीला राहात असल्याची माहिती होती.

पोलिसांनी शोध घेतल्यावर फुरसुंगी येथील दशक्रियाविधी येथे एका खुनाचा गुन्हा अद्याप उघड झाला नसल्याचे लक्षात आले. संतोष हा खून झाल्यानंतर फुरसुंगी येथे राहात नसल्याचे समजले. तो चिखली येथे बहिणीकडे राहायला गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संतोष शिंदे याला ताब्यात घेऊन हडपसर पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने नरसिंग गव्हाणे यांचा खून केल्याचे कबूल केले.

Web Title: Read about the murder that took place a year and a half ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.