सॅलिसबरी पार्कच्या समस्यांना फुटणार वाचा लोकमत आपल्या दारी : मार्केटयार्डला कार्यक्रम

By admin | Published: February 26, 2015 03:21 AM2015-02-26T03:21:43+5:302015-02-26T03:21:43+5:30

डायस प्लॉट वसाहत, लुल्लानगर, पूनावाला पार्क, मीरा सोसायटी, डीएड कॉलनी व सॅलिसबरी पार्क भागातील रस्ते, वाहतूक, पाणी, आरोग्य,

Read more about Salisbury Park's problems | सॅलिसबरी पार्कच्या समस्यांना फुटणार वाचा लोकमत आपल्या दारी : मार्केटयार्डला कार्यक्रम

सॅलिसबरी पार्कच्या समस्यांना फुटणार वाचा लोकमत आपल्या दारी : मार्केटयार्डला कार्यक्रम

Next

पुणे : डायस प्लॉट वसाहत, लुल्लानगर, पूनावाला पार्क, मीरा सोसायटी, डीएड कॉलनी व सॅलिसबरी पार्क भागातील रस्ते, वाहतूक, पाणी, आरोग्य, कायदा व सुव्यवस्थेच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’चा कार्यक्रम गंगाधाम चौक येथील न्यूईरा सोसायटीच्या सभागृहात गुरुवारी (दि. २६) सायंकाळी ४ ते ६ यावेळेत होणार आहे. त्यावेळी प्रभाग क्रमांक ६४ येथील विविध सार्वजनिक समस्यांविषयी स्थानिक नगरसेवक, महापालिका प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांशी थेट संवाद करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
मार्केटयार्डच्या पूर्वेकडील डायस प्लॉट, सॅलिसबरी पार्क, लुल्लानगर, भिमाले कॉम्पलेक्स, पूनावाला पार्क, मिठापल्ली ईस्टेट, मीरा सोसायटी, डीएड कॉलनी अशी प्रभागाची भौगोलिक रचना आहे. या प्रभागात २४ तास वाहनांची वर्दळ असते.
प्रभाग क्रमांक ६४ येथील विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला असून, त्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’चे व्यासपीठ नागरिकांना उपलब्ध होणार आहे. त्यावेळी स्थानिक नगरसेवक श्रीनाथ भिमाले, नगरसेविका कविता वैरागे, मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सर्जेराव बाबर, स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक निकम, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र साळूंके, वाहतूक पोलीस निरीक्षक अनुजा देशमाने, बिबवेवाडी क्षेत्रीय अधिकारी सुनील गायकवाड यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांना थेट संवाद साधण्याबरोबर लेखी स्वरुपातही समस्या मांडता येणार आहेत.

Web Title: Read more about Salisbury Park's problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.