जमिनी देण्यास तयार; पण कवडीमोल भावाने नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:09 AM2021-06-01T04:09:40+5:302021-06-01T04:09:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरूनगर: पुणे-नाशिक रेल्वेसाठी शेतकरी जमिनी देण्यास तयार आहे; मात्र कवडीमोल भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून देणार नाही. ...

Ready to give up lands; But not by Kavadimol Bhav | जमिनी देण्यास तयार; पण कवडीमोल भावाने नाही

जमिनी देण्यास तयार; पण कवडीमोल भावाने नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

राजगुरूनगर: पुणे-नाशिक रेल्वेसाठी शेतकरी जमिनी देण्यास तयार आहे; मात्र कवडीमोल भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून देणार नाही. पोलीस बळाचा वापर करू नका, शेतकऱ्यांचा नाद करू नका, आमच्या मागण्या मान्य करा, तरच मोजणी करा, असा सज्जड दम शेतकऱ्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिला.

होलेवाडी, मांजरेवाडी परिसरातून देशातील पहिली पुणे-नाशिक हाय स्पीड रेल्वे जाणार आहे. यासाठी भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे. रेल्वे अधिकारी व खेड महसूल विभाग तालुक्यातील रेल्वेबाधित शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन शेतकऱ्यांना रेल्वे भूसंपादनाची प्रक्रिया समाजावून सांगत आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वे प्रकल्पासाठी घेणार आहे; मात्र जमिनीला काय भाव देणार, रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला रेड झोन असल्यामुळे शेतकरी भूमिहीन होणार आहे. त्यांचा योग्य तो मोबदला काय देणार? असे प्रश्न रेल्वे अधिकाऱ्यांना बैठकीदरम्यान विचारीत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना याचे उत्तर रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळत नाही. मांजरेवाडी, होलेवाडी, टाकळकरवाडी या परिसरात काही दिवसांपूर्वी रेल्वे मार्गाची मोजणी करण्यासाठी रेल्वे अधिकारी व मोजणी कर्मचारी आले होते. दरम्यान, शेतकऱ्यांनी त्यांना पिटाळून लावले होते. सोमवारी (दि. ३१) मांजरेवाडी, होलेवाडी येथे रेल्वे मार्गाची मोजणीबाबत शेतकऱ्यांना नोटिसा बजवण्यात आली होती. मात्र, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत मोजणी होऊ देणार? नाही? अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे मोजणीला विरोध करण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने जमले होते. काही हिंसक प्रकार होऊ नये म्हणून मोजणी रद्द करून रेल्वे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा समजून सांगण्याचा प्रयत्न केला. या वेळी शेतकऱ्यांनी आक्रमक होत रेल्वे प्रकल्पासाठी जात असलेली शेतजमिनी कोट्यवधी रुपयांच्या आहेत. काही शेतकऱ्यांची तुटपुंजी शेतजमीन रेल्वेसाठी जाणार असून, ते आयुष्यभर भूमिहीन होणार आहे, असे शेतकरी अधिकाऱ्यांना म्हणाले.

शेतकऱ्यांची समस्या, मागणी व भावना वरिष्ठांपर्यंत पोहचून शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल, तोपर्यंत या परिसराची मोजणी केली जाणार नाही, असे या वेळी पुणे महारेल्वेचे जनरल मॅनेजर अधिकारी सुनील हवालदार, चंद्रकिशोर भोर, मंदार विचारे यांनी शेतकऱ्यांना सांगितले. या वेळी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नवनाथ होले, अनुप टाकळकर, सुशील मांजरे, जयसिंग मांजरे, अरुण मांजरे, महादू होले, चंद्रकांत होले, बबन होले, सतीश तनपुरे, सुभाष मांजरे, रोहिदास मांजरे, योगेश मांजरे यांच्यासह रेल्वेबाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

रेल्वे मार्ग २५ मीटरचा होणार आहे. रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूने ३० मीटर अंतरादरम्यान रेड झोन पडणार आहे. रेड झोनमध्ये यापुढे शेतकऱ्याला कुठलाही उद्योगधंदा, घर बांधता येणार नाही. त्या जमिनीची किंमत शून्य होणार आहे. त्याबदल्यात मिळणारा मोबदला तुंटपुजा आहे. त्यामुळे रेड झोनसाठी लागणारी जमीन रेल्वेने घ्यावी व गेल्या तीन-चार वर्षांतील खरेदी-विक्रीचे व्यवहार व खुल्या बाजारातील व्यवहार त्यांच्या पाच पट शेतजमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा. तसेच रेल्वे मार्गात येणाऱ्या विहिरी, फळझाडे, पाईपलाईन यांचाही योग्य मोबदला द्यावा. तो किती देणार हे अगोदर सांगून मग मोजणी करा. पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नका. या परिसरातील सेझ प्रकल्प, राजगुरूनगर शहराबाहेरील पुणे-नाशिक बाह्यवळण यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन करून प्रशासनाला वठणीवर आणले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा नाद करू नका, असा सज्जड दम शेतकऱ्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिला.

फोटो ओळ : होलेवाडी, मांजरेवाडी या परिसरात रेल्वेची मोजणी रोखण्यासाठी जमलेले शेतकरी व शेतकऱ्यांना रेल्वेची भूमिका स्पष्ट करताना रेल्वे अधिकारी.

Web Title: Ready to give up lands; But not by Kavadimol Bhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.