Ready Reckoner Rate: राज्यात दोन वर्षांनंतर रेडीरेकनर दरात सरासरी 5 टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 20:50 IST2022-03-31T20:50:22+5:302022-03-31T20:50:38+5:30

राज्य शासनाकडून दर वर्षी एक एप्रिलपासून पासून नवीन रेडीरेकनर दर ( वार्षिक मुल्यदर तक्ते) जाहीर केले जातात

Ready reckoner rate increase 5 % in maharashtra | Ready Reckoner Rate: राज्यात दोन वर्षांनंतर रेडीरेकनर दरात सरासरी 5 टक्के वाढ

Ready Reckoner Rate: राज्यात दोन वर्षांनंतर रेडीरेकनर दरात सरासरी 5 टक्के वाढ

पुणे : राज्य शासनाकडून दर वर्षी एक एप्रिलपासून पासून नवीन रेडीरेकनर दर ( वार्षिक मुल्यदर तक्ते) जाहीर केले जातात. त्यानुसार सन 2022-23 या आर्थिक वर्षांत राज्यात रेडीरेकनर दरात सरासरी 5 टक्के वाढ करण्यात आली. यात राज्यात महापालिका क्षेत्रात 8.80 टक्के वाढ, ग्रामीण भागात 6.96 टक्के तर नगरपालिका क्षेत्रात 3.62 टक्के वाढ करण्यात आली. यामध्ये राज्यात सर्वाधिक 8.15 टक्के दर वाढ पुणे जिल्ह्यात झाली आहे. तर सर्वात कमी वाढ 0.38 टक्के वाढ हिंगोली जिल्ह्यात झाली आहे. राज्यात रेडीरेकनर दरात सर्वाधिक वाढ 13.12 टक्के मालेगाव महापालिकेत झाली आहे. तर मुंबई- पुण्यात अनेक झोनमध्ये रेडीरेकनर दरात घट करण्यात आली आहे. राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील रेडीरेकनर दर वाढ जाहीर केली. 

चालू वर्षीच्या रेडी रेकनरच्या दरात ही वाढ जाहीर करण्यात आली. कोरोनाच्या संकटामुळे गत वर्षी रेडीरेकनर दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. परंतु सध्या कोरोनाचे संकट कमी झाले असून,  संपूर्ण राज्य निर्बंध मुक्त झाले आहे. यामुळेच गेले दोन वर्षांत झालेले व्यवहार,  पाच वर्षांत झालेला विकास, रस्ते विकास,  मेट्रो सिटी, स्थानिक चौकशी, जमिन खरेदी विक्रीच्या ऑनलाईन जाहिरात सर्व गोष्टींचा विचार करून वस्तुनिष्ठ रेडीरेकनर दर जाहीर करण्याचा प्रयत्न केला असल्याचे हर्डीकर यांनी स्पष्ट केले. कोरोना संकट असताना गत वर्षी दस्त नोंदणीत भरघोस वाढ झाली असून,  याचा परिणाम म्हणून अनेक भागात रेडीरेकनर दरामध्ये वाढ झाली आहे. तर मुंबई शहरासह पुणे शहरामध्ये अनेक भागात यापेक्षा अधिक विकास होऊ शकत नाही त्या भागात रेडीरेकनर दरात घट करण्यात आली.

मुंबईमध्ये तब्बल 864 झोनमध्ये रेडीरेकनर दरात 20-22 टक्क्यांनी घट झाली आहे. तर पुणे शहरामध्ये 8 झोन मध्ये रेडीरेकनर दरात 10 टक्क्यांनी घट झाली आहे. दरम्यान शहरी भागात कचराडेपो, स्मशानभूमी, दफनभुमी, कत्तलखाना, एसटीपी प्लॅन्ट लगत शंभर मी परिसरातील मिळकतीचे रेडीरेकनर दरात राज्यात प्रथम 25 टक्क्यांपर्यंत घट करण्यात आली आहे.

Web Title: Ready reckoner rate increase 5 % in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.