रिअल इस्टेट पुरवणी : इंटरिअर डेकोरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:09 AM2021-05-29T04:09:46+5:302021-05-29T04:09:46+5:30

आर्किटेक्ट केतन कुर्वलकर आर्किटेक्ट सोनाली दाहोत्रे स्वत:चे घर घेणे व आपल्या आवडीनुसार ते सजविणे, हे बहुतेकांचे स्वप्न असतेच, पण ...

Real Estate Supplement: Interior Decoration | रिअल इस्टेट पुरवणी : इंटरिअर डेकोरेशन

रिअल इस्टेट पुरवणी : इंटरिअर डेकोरेशन

Next

आर्किटेक्ट केतन कुर्वलकर

आर्किटेक्ट सोनाली दाहोत्रे

स्वत:चे घर घेणे व आपल्या आवडीनुसार ते सजविणे, हे बहुतेकांचे स्वप्न असतेच, पण आता ती मानसिक गरजदेखील झाली आहे. पण सध्या शहरात घर घेता घेताच नाकी नऊ येतात आणि इंटेरिअर्ससाठी खूप कमी बजेट राहते. खरे तर जास्त बजेट असेल तरच सुंदर इंटेरिअर्स होतं, हा गैरसमज आहे. इंटेरिअर्सचे बजेट अनेकदा मटेरियलमुळे वाढते. डिझाइन करतेवेळी या गोष्टींकडे लक्ष दिल्यास उत्कृष्ट इंटेरिअर्स करता येते.

इंटेरिअर्ससाठी उपलब्ध स्पेस व त्यात जास्तीत जास्त सूर्यप्रकाश आणि वारा कसा खेळता राहील यावर भर दिल्यास घराबाहेरील निसर्ग व ऋतूंशी समरसता येऊ शकेल. घरात राहणाऱ्या लोकांच्या आवडीनिवडी व स्वभाव लक्षात घेऊन डिझाइन, स्टाइल व मटेरियल ठरवावे.

डिझाइन, हे वास्तूचा मेकअप केल्यासारखे नसून, त्यामध्ये मौलिकता असावी, उदा. लाकडासारखी दिसणारी टाइल/ वॉलपेपरऐवजी लाकूडच वापरावे, प्लास्टिकच्या झाडांपेक्षा खरी झाडे ठेवावीत, जेणेकरून मूळ मटेरियलच्या गुणधर्मांचा आपल्याला फायदा होतो व ते दिसायला कृत्रिम मटेरियलपेक्षा सुंदर दिसते.

प्लाय-लॅमिनेट, चकचकीत फरशीच्या तुलनेत नैसर्गिक मटेरियल जसे की लाकूड, दगडी फरशी, बांबू, गवताची चटई, बारदान हे आवाज आणि प्रकाशशोषक व पर्यावरणपूरक असतात, शिवाय कृत्रिम साहित्याची एम्बडेड एनर्जी खूप जास्त असते. त्यामुळे त्याचा कमीत कमी वापर करावा.

जुने लाकूड आणि जुन्या फर्निचरला साधी डागडुजी करून, सर्जनशील रंगसंगती वापरून नव्यासारखे करता येणेही सहज शक्य आहे. प्लास्टिक पेंट न वापरता ब्रीदिंग पेंट वापरल्यास ते अधिक ऊर्जाकार्यक्षम एनर्जी एफिशिएन्ट ठरते. फाॅल्स सीलिंग तांत्रिक गरज असल्यासच करावे. ''लेस इज मोर'' हा संदर्भ ठेवून प्रकाशयोजनेचा विचार करावा.

पण हे सर्व करताना एखाद्या कथेसारखे, थीमनुसार, सर्व डिझाईन एकत्र गुंफले गेले तर वास्तू सजावट हा नुसताच सुंदर नाही, तर एक समाधानकारक आणि अर्थपूर्ण अनुभव ठरू शकतो, यात दुमत नसावे.

(दोघांचा फोटो एकत्रित जेएमएडीट वर आहे)

Web Title: Real Estate Supplement: Interior Decoration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.