रिअल इस्टेट पुरवणी लेख : इंटेरिअर डिझायनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:08 AM2021-06-05T04:08:03+5:302021-06-05T04:08:03+5:30

- गौरव ओसवाल, योगिता ओसवाल (इंटेरिअर डिझायनर) प्रत्येकाला आपले घर सुंदर आणि आकर्षक हवे असे वाटते. ते नटविण्यासाठी इंटिरिअर ...

Real Estate Supplementary Articles: Interior Designing | रिअल इस्टेट पुरवणी लेख : इंटेरिअर डिझायनिंग

रिअल इस्टेट पुरवणी लेख : इंटेरिअर डिझायनिंग

googlenewsNext

- गौरव ओसवाल, योगिता ओसवाल (इंटेरिअर डिझायनर)

प्रत्येकाला आपले घर सुंदर आणि आकर्षक हवे असे वाटते. ते नटविण्यासाठी इंटिरिअर डिझायनर मोलाची भूमिका बजावतो. उजेड आणि खेळती हवा असलेले आणि कमी जागेत व्यवस्थित मांडणी केलेले घर सर्वांना भावते. काँक्रीटच्या जंगलात राहणाऱ्या मानवाने निसर्ग घरात आणला पाहिजे. घराचे आर्किटेक्चर इंटिरिअर डिझायनपूरक बनवावे आणि पुढच्या २० वर्षांचा विचार करून रचना केली तर अधिक चांगले होईल.

घरबांधणीत पैसा खर्च होतो. पण, कमी पैशात, कमी जागेत घर आकर्षक बनविता येते. येथेच इंटिरिअर डिझायनरनी भूमिका महत्त्वाची ठरते. घरात स्टोरेज वाढविण्यासाठी अनेक गोष्टी उपयुक्त आहेत. बंगल्यातील खोल्यात उंची भरपूर असते. सदनिकेत जेमतेम ९ ते साडेनऊ फूट मिळते. येथे पीओपी केले तर इकोचा त्रास कमी होतो. तसेच अखेरच्या मजल्यावर सदनिका असेल तर उष्णतेचा त्रास कमी होतो. लाईट व्यवस्था केली तर घर प्रकाशमान होईल.

मार्बल, टाईल्स, कोटा फरशी किंवा लाकडी फ्लोअर केले जाते. त्याचे फायदे आणि तोटे आहेत. मार्बलची फारशी थंड असते. ती उन्हाळ्यात गारवा देते, तर पावसाळा आणि हिवाळ्यात अधिक थंड राहते. त्यामुळे संधिवाताचा त्रास असणाऱ्यांसाठी त्रासदायक ठरते. त्यावर पडलेले पाणी दिसत नसल्याने घसरून पडण्याचा धोका असतो. लाकडी फ्लोरिंग गुडगेदुखीने बेजार असलेल्यांसाठी फायदेशीर असते. पण, पाणी राहिले तर खराब होते. कोटा फारशा सर्व हवामानासाठी उपयुक्त असून त्याचा मेंटेनन्स काही नसतो.

घरात जादा फर्निचर असले तर घर स्टोअररूम होते. फर्निचर नेहमी हॅन्डल नसलेले असावेत. जेवढे कमी फर्निचर तेवढे घर मोकळे आणि दिसायला सुंदर आणि आटोपशीर असते. घराला रंग देताना तो लस्टर नसावा. कारण त्यात लेड असते. त्याने डोळे चरचुरण्याचा त्रास होतो. त्यामुळे पाण्याचा वापर करून बनविलेले रंग वापरावेत. घर प्रकाशमान करणाऱ्या मन प्रसन्न करणाऱ्या रंगाचा वापर करावा. घरातील विजेचे स्विच हे ब्रांडेड असावेत. त्यामुळे ते जास्त टिकतात आणि मेन्टेनन्स कमी लागतो. दारे खिडक्या यांचे पडदे सौंदर्यात भर घालतात. रंगसंगती आणि आकारमान यानुसार त्याची निवड करावी.

Web Title: Real Estate Supplementary Articles: Interior Designing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.